शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 09:26 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर उद्योगपती एलन मस्क यांनी मोठं विधान केलं.

Elon Musk on Trump Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला. फ्लोरिडा येथील पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर रविवारी गोळीबारी झाल्याची घटना घडली. सुदैवाने ट्रम्प यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर  उद्योगपती एलन मस्क यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे. कमला हॅरिस आणि जो बायडेन यांच्या हत्येचा एकही प्रयत्न कोणी करत नाही, अशी खळबळजनक पोस्ट मस्क यांनी केली आहे. मस्क यांच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली असून अनेकजण त्याबाबत भाष्य करत आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसऱ्यांदा हत्येचा प्रयत्न झाला आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केला गेला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेने दिली आहे. आरोपी युक्रेन समर्थक असून डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा देत असल्याचे वृत्त आहे. या सगळ्या प्रकारानंतर, अब्जाधीश एलन मस्क यांनी त्यांच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. केवळ ट्रम्प यांच्यावरच प्राणघातक हल्ले का केले जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. जो बाडेन किंवा कमला हॅरिस यांच्यावर जीवघेणे हल्ले का होत नाही? अशी पोस्ट मस्क यांनी एक्सवर केली.

एलन मस्क यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर "त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांना का मारायचे आहे?" असा सवाल केला होता. त्यावर उत्तर देताना मस्क यांनी हे धक्कादायक विधान केलं. "आणि कोणीही बिडेन किंवा कमला हॅरिसची हत्या करण्याचा प्रयत्न करत नाही," असं प्रत्युत्तर मस्क यांनी दिलं. जुलैमध्ये मस्क यांनी आगामी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता केलेल्या विधानानं खळबळ उडाली आहे.

काही नेटकऱ्यांनी मस्क यांच्यावर निशाणा साधला.तुमचं काय बिघडवलं आहे, काहीही पोस्ट करण्यापूर्वी विचार करता का? असा सवाल एका नेटकऱ्याने केला. दुसऱ्या एका युजरने, कोणीही कोणाला मारण्याचा प्रयत्न करत नाही, असं म्हटलं. आणखी एका युजरने बायडेन यांच्या काळात ट्रम्प यांच्याविरोधात अनेक घटना घडल्या आहेत, त्यांच्यावर बंदी का घातली जात नाही, असा सवाल केला. 

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कKamala Harrisकमला हॅरिसJoe Bidenज्यो बायडन