शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Howdy Modi : म्हणून 'हाऊडी मोदी' कार्यक्रमासाठी करण्यात आली ह्युस्टन शहराची निवड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 13:45 IST

अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्युस्टमध्ये हाऊडी मोदी या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

ह्युस्टन  - अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी या भव्यदिव्य कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष बाब म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा मोदींसोबत या कार्यक्रमात सहभागी होतील. सुमारे ५० हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, भारत आणि अमेरिकेमधील संबंधांच्या दृष्टीने या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण मानले जात आहे. दरम्यान, हाऊडी मोदी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी काही विशेष कारणांमुळे ह्युस्टन या शहराची निवड करण्यात आली आहे. तसेच या कार्यक्रमाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी उपस्थिती लावण्यामागेही एक महत्त्वपूर्ण कारण आहे. 

हाऊडी मोदी हा कार्यक्रम ह्युस्टन येथे आयोजित होण्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या शहरात मोठ्या प्रमाणावर असलेले भारतीय वंशांचा नागरिकांचे प्रमाण होय. टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात मोठ्या प्रमाणावर भारतीय राहतात. ह्युस्टनप्रमाणेच डल्लास या शहरामध्येही भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ही दोन्ही शहरे अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असलेल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत यापूर्वीही अशा कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. 

हाऊडी मोदी या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांची उपस्थिती ही हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. अमेरिकेत पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. त्यामुळे हाऊडी मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहून या भारतीय वंशाच्या अमेरिकन मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांनी ट्रम्प यांच्याऐवजी हिलेरी क्लिंटन यांना मतदान केले होते. ही बाब नॅशनल एशियन अमेरिकन सर्वेमधून समोर आली होती. त्यामुळे आज मोदींसोबत एकत्र कार्यक्रम करून इंडो-अमेरिकन नागरिकांना आपल्या बाजूने वळवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.   2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल झाले असून आज अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ह्युस्टनमध्ये नरेंद्र मोदींनी तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंशी चर्चा केली आहे.  ‘टेक्सास इंडिया फोरम’ हे  ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील 320 आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.

टॅग्स :Howdy Modiहाऊडी मोदीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका