शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'कॅलिफोर्नियामध्ये ते अजूनही...', इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक पद्धतीची प्रशंसा का केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 12:15 IST

SpaceX आणि Tesla चे मालक इलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले आहे.

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेवर जगाचे लक्ष असते. ईव्हीएममुळे आपल्या देशात ज्या वेगाने मतदान आणि मतमोजणी होते ते पाहून विकसित देशांनाही आश्चर्य वाटते. 

अमेरिकेत नुकत्याच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचा निकाल लागण्यास अनेक दिवस लागले. कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर भाष्य केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची भारतातील लोकसभा निवडणुकीशी तुलना करताना ते म्हणाले की, भारताने एका दिवसात ६४० मिलियन म्हणजेच ६४ कोटी मतांची मोजणी केली, मात्र कॅलिफोर्निया, अमेरिकेत मतमोजणी अजूनही सुरू आहे.

इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, 'भारताने एका दिवसात ६४० मिलियन मतांची मोजणी केली आहे, तर कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतांची मोजणी करत आहे.

अमेरिकेत ५-६ नोव्हेंबरला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीनंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली, मात्र कॅलिफोर्नियामध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत बॅलेट पेपरद्वारे मतदान केले जाते.

इलॉन मस्क यांनी ईव्हीएमला धोकादायक म्हटले होते

मात्र, इलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमवर भाष्य केले होते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे रद्द करू, असे ते म्हणाले होते. मानवाकडून किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका कमी आहे परंतु त्याची शक्यता खूप जास्त आहे.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कAmericaअमेरिका