शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

जपानची ‘जेन झी’ का सोडतेय नोकऱ्या? जपानमध्ये आजवर असं कधीच घडलं नव्हतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:22 IST

या तरुण पिढीला आता कुठलंही ओझं नकोय

जपान हा एक असा देश आहे, जो संपूर्ण जगभरात कष्ट, मेहनत, निष्ठा, प्रामाणिकपणा यासाठी प्रसिद्ध आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी स्वत:ला आपल्या कामासाठी झोकून दिलेलं असतं. ज्या ठिकाणी ते काम करतात, तिथेही आधी काम, त्यानंतर स्वत:ची काळजी हेच त्यांचं धोरण. अलीकडच्या काळात या पद्धतीत मात्र अचानक बदल होताना दिसतो आहे. विशेषतः ‘जेन झी’ पिढीमध्ये.

साधारणपणे १९९५ ते २०१२ या काळात ज्यांचा जन्म झाला आहे, अशा पिढीला ‘जेन झी’ किंवा झुमर्स जनरेशन असं म्हटलं जातं. या तरुण पिढीला आता कुठलंही ओझं नको आहे, कोणाची निष्ठा नको आहे, कोणासाठी विनाकारण त्यांना राबायचं नाहीए. कामाच्या ठिकाणीही ‘पैसा’ हे त्यांचं ध्येय नाहीए. त्यांना पद नको आहे, प्रमोशन नको आहे, प्रतिष्ठा नको आहे, एक एक पायरी वर चढत मोठ्या पदाची हाव त्यांना नाहीए. ‘परफॉर्मन्स बेस्ड प्रमोशन आणि बोनस’ त्यांना नको आहे, चांगलं काम केलं म्हणून वरिष्ठांकडून त्यांना पाठीवर कौतुकाची थाप नको आहे. राब राब राबून ‘उज्ज्वल भविष्यकाळ’ त्यांना नको आहे.

त्यांना हवा आहे ‘मी टाइम’! आज. आत्ता. लगेच. त्यांना हवा आहे स्वत:साठी वेळ. त्यांना जगायचं आहे स्वत:साठी. आपल्याला जे करावंसं वाटतं, ज्यात आपल्याला आनंद मिळेल, तेच त्यांना करायचंय. त्यासाठी नोकरीवर, पैशावर, फसव्या प्रतिष्ठेवर लाथ मारायची त्यांची तयारी आहे आणि सध्या तरी ते तेच करताहेत.

ही पिढी म्हणतेय, जे आमच्या वाड-वडिलांनी केलं, ते आम्हाला आता करायचं नाहीए. त्यांच्यासारखं आम्हाला स्वत:चं आयुष्य वाया घालवायचं नाहीए. त्यामुळे जपानमध्ये अक्षरशः हजारो तरुण अल्पावधीतच नोकऱ्या सोडताहेत. जे ‘नाइलाजानं’ नोकरी करताहेत, त्यांनाही तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. त्यामुळे घड्याळाच्या ठोक्याला कामावर यायचं आणि वेळ झाली की त्या ठोक्याला बाहेर पडायचं, असा नवा शिरस्ता त्यांनी आता पाडला आहे.

जपानमध्ये आजवर असं कधीच नव्हतं. वैयक्तिक आयुष्यापेक्षाही आपल्या कामालाच त्यांनी आजवर महत्त्व दिलं. नव्या पिढीत मात्र हे चित्र आता पूर्णपणे उलटं होताना दिसतं आहे. जपानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या या संकल्पनेचं नाव आहे ‘क्वाएट क्विटिंग’! म्हणजे शांतपणे, काहीही कुरकुर न करता आपला जॉब सोडणं. खरं तर या संकल्पनेनं मूळ धरलं ते अमेरिकेत २०२२मध्ये. ज्या लोकांनी आपल्याला कामापासून अलिप्त ठेवलं आहे आणि जे कमीत कमी काम करतात त्यांच्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जात होता; पण हाच शब्दप्रयोग आता जपानमध्ये ‘जेन झी’ पिढीसाठी वापरला जातो आहे.

जपानमधील एका संशोधन संस्थेनं या संदर्भात नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात दिसून आलं, या पिढीतील तब्बल ४५ टक्के तरुण केवळ आवश्यक तेवढंच काम करताहेत. वेळ येताच ते जॉब सोडताहेत आणि तो वेळ आपल्या आनंदासाठी घालवताहेत. हे तरुण सांगतात, कामावर आमचा राग, त्रागा नाहीए. काम केलं तरच आम्ही घराचं भाडं, इतर बिलं भरू शकू हे आम्हाला माहीत आहे; पण हे आयुष्य एकदाच येतं हेही आम्हाला माहीत आहे. त्याचमुळे ते आम्हाला पुरेपूर जगून घ्यायचंय !

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीJapanजपान