शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

इम्रान खान यांनी कसा रोखला कोरोना?; WHOनं सांगितली पाकिस्तानची रणनीती

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 30, 2020 16:56 IST

पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 3 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 6474 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देपाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 3 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 6474 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने पाकिस्तानात स्थिरता आली आहे. यामुळे आता त्यांच्या अर्थव्यवस्थेनेही वेग घेतला आहे.कोरोनाला रोखणे आणि अर्थव्यवस्था सांभाळणे दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला हव्यात.

इस्लामाबाद - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्हायरस नियंत्रनासंदर्भात पाकिस्तानचे पुन्हा कौतुक केले आहे. पाकिस्तानने केवळ कोरोनाचा प्रसारच थांबवला नाही, तर महामारीदरम्यान आपल्या अर्थव्यवस्थेकडेही लक्ष दिले, असे WHOचे प्रमूख टेड्रोस अ‍ॅडहॅनम यांनी म्हटले आहे. त्यांनी ब्रिटिश वृत्तपत्र, 'द इंडिपेंडंट'सोबत बोलताना ही माहिती दिली. 

टेड्रोस म्हणाले, पाकिस्तानने गेल्या अनेक वर्षांत पोलिओसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले होते. त्याचा वापर त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी केला. ज्या सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांना घरा-घरात जाऊन पोलिओचा डोस देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत पाकिस्तानने कोरोना काँटॅक्ट ट्रेसिंग आणि सर्व्हिलांसिंगसाठी घेतली. तसेच, पाकिस्तानला या रणनीतीमुळे कोरोना व्हायरसवर नियंत्रण तर मिळवता आलेच पण त्यांच्या अर्थव्यवस्थेचा गाडाही पटरीवर आला, असेही ट्रेडोस म्हणाले. कोरोना नियंत्रणात आल्याने पाकिस्तानात स्थिरता आली आहे. यामुळे आता त्यांच्या अर्थव्यवस्थेनेही वेग घेतला आहे. कोरोनाला रोखणे आणि अर्थव्यवस्था सांभाळणे दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला हव्यात. यांपैकी केवळ एका गोष्टीची निवड करता येत नाही.  कोरोनाला रोखण्यात पाकिस्तानबरोबरच थायलंड, इटली, उरुग्वे आणि इतर देशांच्या सामूहिक प्रयत्नांचीही ट्रेडोस यांनी प्रशंसा केली. मे महिन्यातही जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी पाकिस्तानची प्रशंसा केली होती. यावेळी जगानेही कोरोनाचा सामना कसा करावा हे पाकिस्तानकडून शिकायला हवे, असेही ते म्हणाले.

पाकिस्तानात 36 टक्के वर्कफोर्समध्ये कोरोनाविरोधातील इम्युनिटी विकसित -पाकिस्तानातच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे, की आता पाकिस्तानात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ब्लड डिसीज, कराचीच्या या स्टडीला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जर्नल ऑफ पब्लिक हेल्थमध्येही प्रकाशित करण्यात आले आहे. पाकिस्तानात 36 टक्के वर्कफोर्समध्ये कोरोनाविरोधातील इम्युनिटी विकसित झाली असल्याचेही या स्टडित सांगण्यात आले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत जवळपास 3 लाख कोरोना रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी 6474 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाImran Khanइम्रान खान