शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 11:52 IST

Elon Musk News: टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र यावेळी  मस्क यांच्या कामापेक्षा त्यांच्या काळ्यानिळ्या झालेल्या डोळ्याचीच चर्चा अधिक झाली.  

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क हे शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र यावेळी  मस्क यांच्या कामापेक्षा त्यांच्या काळ्यानिळ्या झालेल्या डोळ्याचीच चर्चा अधिक झाली.  एलन मस्क यांना नेमकं झालंय काय? असा प्रश्न लोकांना पडला होता. याबाबत एलन मस्क यांना विचारले असता त्यांनी ही माझ्या लिटिल एक्स या पाच वर्षांच्या मुलाने मला दिलेली भेट आहे असे सांगितले.

मस्क म्हणाले की, मी एक्स सोबत खेळत होतो. तेव्हा गमती गमतीत त्याला सांगितलं की तोंडावर बुक्की मार. तेव्हा त्याने खरोखरच बुक्की मारली. त्यावेळी फारसं काही वाटलं नाही. मात्र नंतर डोळ्यांवर सूज आणि काळा डाग आला.

एलन मस्क यांनी असं सांगितल्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘’खरोखरच एक्सने असं केलं? तो करू शकतो. तुम्ही एक्सला ओखळत असाल तर हे माहिती असेल.’’ दरम्यान, या दुखापतीविषयी पत्रकारांनी सुरुवातीला विचारल्यावर एलन मस्क यांनी गमतीदार उत्तर दिलं. ते म्हणाले की. ‘’मी फ्रान्सजवळ नव्हतो’’. त्यावेळी त्यांचा इशारा हा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांची पत्नी ब्रिजिक मॅक्राँ यांच्याकडे होता. त्या हल्लीच आपले पती आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्राँ यांना मारताना दिसल्या होत्या.

दरम्यान, एलन मस्क हे व्हाइट हाऊसमध्ये कार्यरत राहणार असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, मस्क हे खरोखरच कुठेही जात नाही आहेत. ते वेळोवेळी व्हाईट हाऊसमध्ये परतत राहतील. कारण DOGE हे त्यांचंच अपत्य आहे.  

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्लाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प