शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

US Visa: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना मुलाखतीतून सवलत मिळवण्यास कोण पात्र ठरतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 14:05 IST

बदललेल्या धोरणानुसार  F, H-1, H-2, H-3, H-4, L, M, O, P, Q किंवा शैक्षणिक J व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्ती मुलाखतीला न येता व्हिसासाठी अर्ज करू शकता.

प्रश्न: मुलाखत सवलत कार्यक्रमाच्या माध्यमातून अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी कोण पात्र ठरतं?

उत्तर: बदललेल्या धोरणानुसार  F, H-1, H-2, H-3, H-4, L, M, O, P, Q किंवा शैक्षणिक J व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्ती मुलाखतीला न येता व्हिसासाठी अर्ज करू शकता. मुलाखतीतून तात्पुरती दिलेली सूट ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत असेल. सचिवांनी मुदतवाढ दिल्यास तिला मुदतवाढ मिळेल.

या तात्पुरत्या सवलतीचा लाभ घ्यायचा असल्यास, अर्जदाराला याआधी अमेरिकेचा व्हिसा (कोणत्याही प्रकारचा) जारी झालेला असावा. त्या व्यक्तीला अमेरिकेचा व्हिसा कधीही नाकारण्यात आलेला नसावा आणि संभाव्य व्हिसा अपात्रतेचे कोणतेही संकेत नसावेत. अर्जदार जिथे अर्ज करणार आहेत, त्या देशाचे ते नागरिक असावेत. अर्जदाराची पात्रता तपासण्यासाठी अतिरिक्त माहिती हवी असल्यास त्याला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार व्हिसा अधिकाऱ्यांना आहे. काही अर्जदारांना अपडेटेड फिंगरप्रिंट्स जमा करावे लागू शकतात.

व्हिसाची मुदत संपल्यानंतर ४८ महिन्यांत नुतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्या (त्याच व्हिसा प्रकारासाठी) मुलाखत सवलतीसाठी पात्र ठरतात. १४ वर्षांखालील मुलं आणि ८० वर्षांवरील व्यक्तीदेखील मुलाखतीतून सवलत देण्यासाठी अर्ज करू शकतात. शेवटच्या अमेरिकेच्या व्हिसासाठी ते पात्र ठरले असल्यास त्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल. मुलाखत सवलतीच्या धोरणाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी https://in.usembassy.gov/visas/ या संकेतस्थळाला भेट द्या.

वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या शंका: माझ्या स्टुटंड व्हिसाची (F-1) मुदत पाच वर्षांपूर्वी  संपली. आता मी वर्क व्हिसासाठी (H1-B, L, इत्यादी.) अर्ज करत आहे. मी मुलाखतीतून सवलत मिळवण्यास पात्र ठरू शकतो का?

होय. अर्जदाराची व्हिसा पात्रता तपासून पाहण्याची गरज वकिलातीमधील अधिकाऱ्यांना वाटल्यास, अतिरिक्त माहितीसाठी मुलाखतीला बोलावण्याचे अधिकार त्यांना आहेत.

माझ्या टुरिस्ट व्हिसाची (B1/B2) मुदत पाच वर्षांपूर्वी संपली. आता मला माझ्या टुरिस्ट व्हिसाचं नुतनीकरण करायचं आहे. मुलाखतीतून सूट मिळवण्यास मी पात्र आहे का?

नाही. जर तुम्ही त्याच प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करत असल्यास त्या व्हिसाची मुदत संपून ४८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटलेला नसावा.

टॅग्स :Visaव्हिसा