शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:20 IST

Blaise Metreweli MI6 Chief: पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने केली नियुक्ती

Blaise Metreweli MI6 Chief: जेम्स बाँड या काल्पनिक चित्रपटामुळे MI6 सीक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिस (SIS) ला जगभरात लोकप्रियता मिळाली. आता ही एजन्सी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी चर्चेत येण्याचे कारण कोणताही चित्रपट नाही, तर MI6 मध्ये सर्वोच्च पदावर एका महिला अधिकाऱ्याची झालेली नियुक्ती. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की केयर मेट्रेवेली या MI6चे १८व्या प्रमुख असतील.

पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले...

पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले की, ब्लेझ मेट्रेव्हेली यांची नियुक्ती ऐतिहासिक आहे. ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा आपल्या गुप्तचर सेवांचे काम पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले आहे. युनायटेड किंग्डमला अनेक धोक्यांचा सामना करावा लागत आहे. काही वेळा हल्लेखोरांचा धोका असतो, कधी पाण्यात गुप्तचर जहाजे पाठवली जातात, तर कधी सार्वजनिक सेवांमध्ये व्यत्यय आणणारे हॅकर्स त्रास देतात. अशा वेळी MI6चे काम खूप वाढले आहे.

कोण आहेत ब्लेझ मेट्रेवेली?

ब्लेझ मेट्रेवेली या MI6 मध्ये डायरेक्टर जनरल टेक्नोलॉजी अँड इनोवेशन या पदावर आहेत. त्यांनी यापूर्वी MI5 मध्ये डायरेक्टर स्तरावरील भूमिका बजावली होती. त्या एक करिअर इंटेलिजेंस अधिकारी आहेत. १९९९ मध्ये केस ऑफिसर म्हणून त्या सेवेत रुजू झाल्या. त्यांनी सेवेत विविध भूमिका बजावल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बहुतांश काळ मध्य पूर्व आणि युरोपमध्ये ऑपरेशनल कामात घालवला. त्यांनी केंब्रिजमधील पेम्ब्रोक कॉलेजमधून मनुष्य विज्ञानाचा अभ्यास केला आहे.

टॅग्स :Englandइंग्लंडPoliceपोलिस