शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

CoronaVirus News: कोरोना लसींना घाईघाईत परवानग्या देऊ नका, गंभीर परिणाम होतील; WHO चा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 09:54 IST

संपूर्ण चाचण्या पूर्ण न करता लसींचा वापर झाल्यास धोका वाढेल; जागतिक आरोग्य संघटनेकडून भीती व्यक्त

कोरोनावरील लसींना घाईघाईत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापराच्या परवानग्या देत असल्याचं नुकतंच म्हटलं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला. कोरोना लसींचा वापर करण्यासाठी घाई करू नका, असा सल्ला संघटनेकडून देण्यात आला आहे.परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल पूर्ण खात्री नसलेल्या कोरोना लसींचा वापर केल्यास त्याचे गंभीर साईड इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देताना संबंधित प्राधिकरणांनी जबाबदारीनं निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं.कोरोनास्त्र! चीनने भारतासह G7 देशांना झोपविले; GDP त स्वत: मात्र प्लसमध्ये'तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय कोरोनावरील लसीला परवानगी द्यायची नाही, यावर सगळ्यांचं एकमत आहे. सर्व चाचण्या झाल्याशिवाय कोरोना लसीला परवानगी देणं धोकादायक ठरू शकतं. अपुऱ्या चाचण्या झालेल्या लसींचा वापर केल्यास कोरोना संकटाचा शेवट होणार नाही. उलट हे संकट आणखी गंभीर होईल. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल,' असं स्वामीनाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं.ऑक्टोबरमध्ये भारतातील रुग्णसंख्या वाढणार?, अमेरिकेतील इन्स्टिट्यूटचा दावाअमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त स्टिफन हान यांनी कोरोना लसीबद्दल नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला. लस केवळ तिसऱ्या टप्प्यात आहे, म्हणून तिला परवानगी नाकारणार नाही, असं हान यांनी 'फायनान्शियल टाईम्स' वृत्तपत्राला सांगितलं. लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झालेला नसला, तरीही आम्ही लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊ. याबद्दलचे निर्णय वैज्ञानिक माहितीच्या आधारे घेतले जातील, असं हान यांनी म्हटलं आहे.कोरोनावरील लस चालू वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटलं आहे. कोरोनाची लस ३ नोव्हेंबरच्या आधी बाजारात येईल, असं ट्रम्प अनेकदा म्हणाले आहे. ३ नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यामध्ये ट्रम्प उमेदवार आहेत.LAC पार गेलेल्या जवानांना तात्काळ मागे बोलवा, चीनकडून भारतावर गंभीर आरोपशाब्बास पठ्ठ्यांनो! पँगौंग तलावानजीक ‘Strategic Height’वर भारताचा कब्जा; चीनला जबरदस्त दणका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या