शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कफ सिरपमुळे इराकमध्ये गदारोळ; WHO ने जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 15:55 IST

डब्ल्यूएचओने इराकमध्ये विक्री होणाऱ्या भारतीय कफ सिरफबाबत अलर्ट जारी केला आहे.

काही महिन्यांपूर्वी काही देशांमध्ये भारतातील औषधांवर बंदी घालण्यात आली होती. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने आता आणखी एका भारतीय कफ सिरप (पॅरासिटामॉल आणि क्लोरफेनिरामाइन) बाबत इशारा जारी केला आहे. WHOने 10 जुलै रोजी इराकमध्ये या सिरपचा नमुना घेतला होता. हा नमुना तपासात फेल ठरला. 

भारतात बनवलेल्या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण आढळून आले असून ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. बॅचमधील या सिरपमध्ये 0.25 टक्के डायथिलीन ग्लायकॉल आणि 2.1 टक्के इथिलीन ग्लायकॉल आढळल्याची माहिती आहे. 

प्रमाणापेक्षा जास्त केमिकल सापडलेरॉयटर्सच्या वृत्तानुसार, WHO ने सोमवारी सांगितले की, हे सिरप फोरर्ट्स (इंडिया) लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडने डॅबीलाईफ फार्मा प्रायव्हेट लिमेटेडसाठी तयार केले आहे. एका सिरपमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि डायथिलीन ग्लायकॉल, या दोन्हींची निर्धारित मर्यादा 0.10 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय, उत्पादक-विक्रेत्याने उत्पादनाबाबत डब्ल्यूएचओला सुरक्षितता आणि गुणवत्तेची कोणतीही हमी दिलेली नाही.

सिरप वापरू नका, मृत्यू होऊ शकतोहे सिरप वापरणे असुरक्षित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. त्याचा वापर एखाद्याचे आरोग्य गंभीरपणे बिघडू शकते किंवा मृत्यू देखील होऊ शकतो. सध्या या संदर्भात कंपन्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

डब्ल्यूएचओने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सांगितले होते की, हरियाणामध्ये निर्मित मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडची चार उत्पादनांची तपासणी सुरू आहे. तसेच, डिसेंबर 2022 मध्ये WHO ने यूपीमध्ये बनवल्या जाणार्‍या बायोटेक प्रायव्हेटच्या दोन उत्पादनांबाबत अलर्ट जारी केला होता. 

हजारो कारखाने सर्टिफिकेटविना सुरू आरोग्य मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, देशातील 10,500 फार्मास्युटिकल कारखान्यांपैकी 8,500 MSME श्रेणीत येतात. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी फक्त 2,000 कारखान्यांकडे डब्ल्यूएचओचे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस (जीएमपी) प्रमाणपत्र आहे. 6,500 औषधी कारखान्यांकडे हे प्रमाणपत्र नाही. औषधांच्या दर्जासाठी हा पुरावा असणे अत्यंत आवश्यक आहे. 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाMedicalवैद्यकीयIndiaभारत