शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेला वाद पत्रकाराला पडला महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 13:10 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि CNN चा पत्रकार यांच्यात वाद झाला होता. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव असून या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि CNN चा पत्रकार यांच्यात वाद झाला होता. जिम अकोस्टा असे या पत्रकाराचे नाव असून या वादानंतर पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेण्यात आले. बुधवारी ट्रम्प आणि पत्रकारामध्ये हा वाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अकोस्टाने डोनाल्ड ट्रम्प यांना विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारला. प्रश्न ऐकल्यावर ट्रम्प यांना राग आला आणि त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळी तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला? असा प्रश्न विचारल्याने ट्रम्प चिडले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी 'तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही तू एक उद्धट माणूस आहेस' असं म्हणत पत्रकाराचा अपमान केला. मात्र  पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी दुसरा प्रश्न विचारला. 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जेव्हा पार पडली तेव्हा त्या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? असे या पत्रकाराने विचारले. दुसऱ्या प्रश्नानंतर ट्रम्प यांचा पारा चढला. या सगळ्या वादानंतर CNN या वृत्तवाहिनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJournalistपत्रकार