शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

कोरोनाच्या लढाईसाठी अमेरिकेनं दिलं दोन लाख कोटी डॉलरचं पॅकेज, शेअर बाजारात संचारला उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:34 PM

विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातल्या शेअर्स बाजारात उत्साह संचारला आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातल्या अमेरिका, रशिया या बलाढ्य देशांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं २ लाख कोटी डॉलर(जवळपास १५० लाख कोटी रुपयां)चं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातल्या शेअर्स बाजारात उत्साह संचारला आहे.

वॉशिंग्टनः कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगातल्या अमेरिका, रशिया या बलाढ्य देशांनीही कोरोनाचा धसका घेतला आहे. कोरोनाचा जगभरातल्या अर्थव्यवस्थांवरही दुष्परिणाम झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं २ लाख कोटी डॉलर(जवळपास १५० लाख कोटी रुपयां)चं पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संसदेत याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर जगभरातल्या शेअर्स बाजारात उत्साह संचारला आहे.भारताच्या शेअर बाजारानंही चांगलीच उसळी घेतली असून, सेन्सेक्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तसेच कच्च्या तेलाच्याही किमती वाढल्या आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी आणि कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी अमेरिकेनं दोन लाख कोटी डॉलरचं पॅकेजची घोषणा केली आणि आशियाच्या शेअर बाजारांत उत्साह संचारलाय.आंतरराष्ट्रीय बेंचमार्कनुसार ब्रेंट क्रूड २.९ वाढून जवळपास २८ डॉलर प्रति बॅरल किमतीवर पोहोचलं आहे. अमेरिकन बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ३.५ टक्क्यांनी वाढून २५ डॉलर प्रतिबॅरलवर पोहोचलं आहे. प्रवासाला घातलेले प्रतिबंध आणि जगभरात  करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दोन्ही बेंचमार्क खाली येताना दिसत होते. तसेच सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान शीतयुद्ध सुरू असल्यानं तेलाच्या किमती पडल्या होत्या. अमेरिकेच्या शेअर बाजारात ८७ वर्षांनी आलेली सर्वात मोठी तेजी असून, दिलासादायक पॅकेजची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारानं जोरदार उसळी घेतली आहे. डाऊ जोन्सचा निर्देशांकही ११.४ टक्क्यांनी उसळला आहे. तसेच १९३३नंतरची ही सर्वात मोठी तेजी आहे.  

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या