शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सोन्याच्या साठ्यांवर बसलंय तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 14:04 IST

भारत हा सोन्याचा सर्वात मोठा आयातदार आहे.

मुंबई - एकेकाळी भारतामधून सोन्याचा धूर निघत असे, लोकांकडे भरपूर सोनंनाणं असायचं असं म्हटलं जायचं. पण आज जगातील विविध देशांचा विचार केला तर सोन्याचे साठे पाश्चिमात्य देशांकडे सर्वात जास्त असल्याचे दिसून येते. चकाकणाऱ्या पिवळ्या धातून शेकडो वर्षे माणसाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. भारतीय व्यक्तींनी आजही सोनं खरेदी करण्यात कोणतीही घट झालेली नाही. अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असून या देशामध्ये 8,133.5 टन इतका सोन्याचा साठा आहे. सोनं साठवून ठेवणारे जगातील काही देश पुढीलप्रमाणे आहेत. जर्मनी- जर्मनीमध्ये 3,377.9 टन इतका सोन्याचा साठा आहे. अमेरिकेनंतर जर्मनीचाच नंबर लागतो. या देशाच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीमध्ये सोन्याचा वाटा 67.6 टक्के इतका वाटा आहे. जर्मनीने आतापर्यंत आपले सोने इतर देशांमध्ये ठेवलेले होते आता ते जर्मनी आपल्या देशात परत घेत आहे.

 फ्रान्स- फ्रान्सने आपल्या सोन्याच्या साठ्यापैकी काही सोने नुकतेच विकले आहे तरिही या देशात 2,435.8 टन इतके सोने आहे.

चीन- चीन हा सोने उत्पादनात एक महत्त्वाचा देश आहे. मात्र या देशात 1,842.6 टन इतकेच सोने आहे.

 रशिया- या देशामध्ये 1,615,2 टन इतके सोने आहे.

स्वीत्झर्लंड- 1,040 टन इतके सोने या देशात आहे. देशाच्या परदेशी चलनाच्या गंगाजळीपैकी 5.6 टक्के सोन्याचा वाटा आहे.

जपान- जपानमध्ये 765.2 टन इतके सोने आहे.

नेदरलँड्स 612.5 टन इतके सोने आहे.

भारत- सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक असणाऱ्या या देशात 557.8 टन इतक सोने आहे. 

टॅग्स :Goldसोनं