शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

जगातील सर्वात पहिले चुंबन कधी घेतले? कोपनहेगन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी समोर आणले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 07:23 IST

मानवांमधील ‘रोमँटिक चुंबना’चा सर्वात जुना पुरावा शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला असून, सुमारे इ.स.पू. २५०० च्या प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.

कोपनहेगन : शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुने पुरावा असलेले चुंबन सुमारे ४५०० वर्षांपूर्वीचे आहे, असा दावा कोपनहेगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. मानवांमधील ‘रोमँटिक चुंबना’चा सर्वात जुना पुरावा शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला असून, सुमारे इ.स.पू. २५०० च्या प्राचीन ग्रंथात याचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.

संशोधकांनी सांगितले की, प्रथम रेकॉर्ड केलेले रोमँटिक चुंबन मध्य पूर्वमध्ये सुमारे ४,५०० वर्षांपूर्वीचे होते. सुमारे १००० वर्षांपूर्वी ऐतिहासिक भारतीय ग्रंथांमध्येही याचे वर्णन करण्यात आले. मेसोपोटेमियामध्ये सापडलेल्या मातीच्या गोळ्यांचा अभ्यास केल्यानंतर डॅनिश शास्त्रज्ञांनी हा शोध लावला. हे लैंगिक खेळाचे गोळे कांस्य युगातील आहेत. चुंबनाचे वर्णन सुमेरियन आणि अक्कडियन भाषेतील सर्वात जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळले. मेसोपोटेमियात दोन्ही भाषा बोलल्या जात होत्या. या भाषेतील लेखनाचा उगम इराकमध्ये इ.स.पू. ३२०० मध्ये झाला असे मानले जाते. मेसोपोटेमिया विद्यापीठातील वैद्यकीय इतिहासातील तज्ज्ञ डॉ. ट्रोल्स पंक अर्बोल म्हणाले की, प्राचीन मेसोपोटेमियातील लोक मातीच्या गोळ्यांवर क्यूनिफॉर्म लिपीमध्ये लिहीत असत. प्राचीन काळात चुंबन हा रोमँटिक जवळीकीचा भाग कसा मानला जात होता, याचे ते स्पष्ट उदाहरण आहेत.

तेव्हाही होती संसर्गची भीतीसंशोधन अहवालानुसार, त्या काळातही मानवाने असा अंदाज लावला होता की, चुंबनाने अनेक प्रकारचे संक्रमण किंवा विषाणू पसरू शकतात. त्या काळातील अनेक ग्रंथांमध्ये बुबुतु किंवा बुशानु यांसारख्या रोगांचा उल्लेख आहे. हे रोग आज नागीण म्हणून ओळखले जातात.

चुंबन होते दैनंदिन जीवनाचा एक भागnसंशोधनातून असे दिसून आले आहे की, ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकाच्या अखेरीस लैंगिक संबंध, कौटुंबिक आणि मैत्रीच्या संबंधांमध्ये चुंबन हा दैनंदिन जीवनाचा एक सामान्य भाग होता. कदाचित ती एका प्रदेशाची खासियत नसून जगभर पसरलेली असावी. nडॉ. ट्रोल म्हणतात की, त्यामुळे चुंबन ही प्रथा मानली जाऊ नये, जी एका विशिष्ट प्रदेशात निर्माण आणि तेथून संपूर्ण जगात पसरली.

टॅग्स :relationshipरिलेशनशिप