छोट्यांच्या पार्टीत ओबामा डान्स करतात तेव्हा...

By Admin | Updated: November 1, 2016 14:53 IST2016-11-01T14:53:10+5:302016-11-01T14:53:10+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये छोट्यांसाठी आयोजित केलेल्या पार्टीत मायकेल जॅक्सनच्या गाण्यावर डान्स केला.

When Obama performs dance in a little party ... | छोट्यांच्या पार्टीत ओबामा डान्स करतात तेव्हा...

छोट्यांच्या पार्टीत ओबामा डान्स करतात तेव्हा...

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 1 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा अध्यक्षीय कार्यकाळ आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यानिमित्ताने काल रात्री व्हाइट हाऊसमध्ये छोट्यांसाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत छोट्यांबरोबर भरपूर धमाल मस्ती करतानाच अमेरिकेच्या मिस्टर प्रेसिडेंटनी गाण्याच्या ठेक्यावर नाचही केला.  
अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार कुठल्याही व्यक्तीला दोन पेक्षा जास्तवेळा राष्ट्राध्यक्षपद भूषवता येत नाही. त्यामुळे दोन वेळा अध्यक्षपद भूषवणारे ओबामा आता पुढील आठवड्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी ठरणाऱ्या उमेदवाराकडे आपला कार्यभार सुपूर्द करतील. त्यामुळे अध्यक्षपदावरून निरोप घेणाऱ्या ओबामांच्या निवासस्थानी सध्या मेजवान्यांची रेलचेल सुरू आहे. 
 
(बराक ओबामा इसिसचे संस्थापक, ट्रम्प यांची खरमरीत टीका)
(अणुबॉम्ब टाकल्याबद्दल क्षमा मागणार नाही - बराक ओबामा) 
 
काल व्हाइट हाउसमध्ये छोट्या मुलासाठी अशाच हॅलोविन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळची छायाचित्रे आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात बराक ओबामा  आणि मिशेल ओबामा  छोट्यांसोबत धमाल करताना दिसत आहेत. तसेच या पार्टीमध्ये ओबामा यांनी मायकेल जॅक्सनच्या गाण्यावर नाचही केला. व्हाइट हाऊसकडून आयोजित करण्यात आलेल्या या हॅलोविन पार्टीसाठी सुमारे 4 हजार लोकांनी व्हाइट हाऊसला भेट दिली. या पार्टीसाठी कोलंबिया, मेरीलँड आणि व्हर्जिनियातील शाळांमधूनही विद्यार्थी आले होते, अशी माहिती व्हाइट हाऊसने दिली आहे.  
 

Web Title: When Obama performs dance in a little party ...