शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

स्पेनमधली मुलं रस्त्यावर धावली तेव्हा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 02:59 IST

४४ दिवस ही मुलं घरात राहिली; मात्र कालचा रविवार त्यांच्यासाठी स्वातंत्र्य घेऊन आला.

४४ दिवस मुलं घरात होती. कोंडलेलीच. बाहेर जायची परवानगी नाही. देशात मृत्यूचं थैमान. १४ वर्षांखालच्या मुलांना धोका नको म्हणून त्यांना घराबाहेर पडण्यास, बागेत, रस्त्यावर खेळण्यासही सक्त मनाई केली होती. ४४ दिवस ही मुलं घरात राहिली; मात्र कालचा रविवार त्यांच्यासाठी स्वातंत्र्य घेऊन आला.स्पेनची ही गोष्ट. रविवारी सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान १४ वर्षांखालील मुलांना घराबाहेर पडण्याची आणि आपल्या घराभोवती किलोमीटरभर अंतरावर फिरण्याची, पळण्याची, खेळण्याची परवानगी सरकारने दिली. एका दिवसापुरतीच. त्या दिवशी ही सारी पाखरं घराबाहेर पडली. कितीतरी दिवसांनी त्यांनी पायात रनिंग शूज घातले. बाहेर जायचे कपडे घातले. सायकली बाहेर काढल्या. मुलं मनसोक्त हुंदडली. पळाली. त्यांनी उड्या मारल्या. बागेत गेली. स्पेनमध्ये या वयाची साधारण ६ लाख मुलं आहेत. त्यांनी कितीतरी दिवसांनी बाहेरचं जग पाहिलं. अनेक मुलांनी माध्यमांना सांगितलं की, ‘आधी वाटलं आपण पळणं, सायकल चालवणं विसरलो की काय? पण जमलं!’ या मुलांचे पालक दमले त्यांच्यासोबत फिरून; पण मुलं थकली नाहीत. त्या दिवशी खऱ्या अर्थानं शहरं पुन्हा जिवंत झाली, जगण्याची आस रस्त्यावर धावली. आता २ मेपासून आपल्या राहत्या घराच्या आसपास दिवसातून एक तास फिरण्याचा, व्यायाम करण्याच्या परवानगीचा विचार सरकार करत आहे. कोरोनाचे काळे ढग हटतील, जगणं पुन्हा मोकळा श्वास घेईल, अशी आशा वाटू लागावी, असं काहीतरी रविवारी तेथे घडलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या