शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन व्हिसासाठीचा अर्ज मंजूर झाला असल्यास व्हिसा असलेला पासपोर्ट कधी आणि कसा मिळेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 13:43 IST

व्हिसा मंजूर झाल्यानंतर पासपोर्ट मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत

माझा अमेरिकन व्हिसासाठीचा अर्ज मंजूर झाला आहे. व्हिसा असलेला पासपोर्ट मला कधी आणि कसा मिळेल?

उत्तर: व्हिसा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्हाला पिकअपसाठीची पद्धत विचारली जाईल. तुम्हाला व्हिसा मंजूर झाला असल्यास, अमेरिकन दूतावास तुमचा पासपोर्ट ठेऊन घेईल. त्यात व्हिसा इन्सर्ट केल्यावर तुमचा पासपोर्ट पिकअपसाठी तयार असल्याचा एसएमएस आणि ईमेल तुम्हाला येईल. या प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी https://www.ustraveldocs.com/in/en/ सर्वोत्तम स्रोत आहे. तुमचा पासपोर्ट शक्य तितक्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच ध्येय आहे.

व्हिसा मंजूर झाल्यानंतर पासपोर्ट मिळवण्यासाठी दोन पर्याय आहेत:तुम्ही पासपोर्ट व्हिसा ऍप्लिकेशन केंद्रातून (व्हीएसी) घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला भारत सरकारनं जारी केलेलं ओळखपत्र घेऊन यावं लागेल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्य किंवा मित्राचा पासपोर्ट घेत असाल, तर तुम्हाला व्हिसा अर्जदाराची स्वाक्षरी असलेलं परवानगी पत्र आणावं लागेल. सोबत तुमचंही ओळखपत्र घेऊन यावं लागेल. अर्जदार १८ वर्षांखालील असल्यास त्याचा जन्मदाखला किंवा शाळेचं ओळखपत्र आणावं लागेल. व्हीएसीमधून पासपोर्ट घेताना कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

जर तुम्ही व्हीएसीमधून पासपोर्ट घेण्याचा पर्याय निवडला नसेल, तर तुम्हाला एका अर्जदारामागे प्रीमियम डिलिव्हरीसाठी ६५० रुपयांचं अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. डिलिव्हरीच्या वेळी तुम्हाला या सेवेसाठी डिजिटल पेमेंट करावं लागेल. तुमच्या ईमेलवर या सेवेची पेमेंट पावती पाठवली जाईल.

तुम्ही १४ दिवसांत पासपोर्ट न घेतल्यास तो पासपोर्ट तुम्ही अमेरिकेच्या ज्या दूतावास/वकिलातीमधून अर्ज केला होता, तिथे परत पाठवण्यात येईल याची नोंद घ्या. त्यानंतर तुम्हाला स्वत: जाऊन त्या दूतावास/वकिलातीमधून पासपोर्ट घ्यावा लागेल.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे  http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :Americaअमेरिकाpassportपासपोर्टVisaव्हिसा