अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तब्बल ६० हून अधिक देशांवर कर लादण्याची घोषणा केली आहे. यामुळे देशात महागाई वाढण्याची शक्यता आहे. यूबीएसच्या अहवालानुसार, यामुळे महागाईत ५% वाढ होऊ शकते. तसेच जीडीपी वाढीवरही याचा परिणाम होऊ शकतो. याचे कारण म्हणजे अमेरिका जगाच्या कानाकोपऱ्यातून अन्नपदार्थ आयात करते.अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जगातील प्रत्येक लहान-मोठा देश अमेरिकेसोबतचा व्यापार वाढवू इच्छितो.
अमेरिकन बाजारपेठेतील बहुतेक वस्तू या आयात केल्या जातात. अगदी देशातील पिण्याचे पाणीदेखील. बहुतेक अन्नपदार्थ शेजारच्या मेक्सिको आणि कॅनडातून येते. नवीन टॅरिफ या दोन्ही देशांना लागू होणार नाहीत. मेक्सिको हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे तर कॅनडा तिसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी चीन हा अनेक वर्षांपासून अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांचे संबंध बिघडले आहेत.
तर जाणून घेऊयात, अमेरिका कोणत्या देशातून कोणते अन्नपदार्थ आयात करते -अमेरिका आपल्या शेजारी कॅनडामधून मशरूम, गोमांस, डुकराचे मांस, मासे, लॉबस्टर, खेकडे, कॅनोला तेल, गहू, कॉर्न, ओट्स, बार्ली आणि मॅपल सिरप आयात करते. त्याचप्रमाणे टोमॅटो, एवोकॅडो, शिमला मिरची, क्रॅनबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी, काकडी, ब्रोकोली, टरबूज, आंबा, शतावरी, लिंबू, कांदा, पालक, लेट्यूस, अक्रोड आणि साखर हे प्रामुख्याने मॅक्सिकोमधून आयात केले जाते. बहुतेक सफरचंदाचा रस आणि गोठलेले मासे चीनमधून येतात. द्राक्षे आणि पोल्ट्री चिलीमधून आयात केली जातात तर कच्ची कॉफी कोलंबियामधून येते. अमेरिका आपले बहुतेक पाणी फिजीमधून आयात करते. अमेरिकेत बहुतेक मेंढ्यांचे मांस ऑस्ट्रेलियामधून येते, तर बहुतेक संत्र्याचा रस ब्राझीलमधून आयात केला जातो.
बहुतांश दुधाचा पुरवठा न्यूझीलंडमधून -या बरोबर, कोस्टा रिका हा अमेरिकेचा सर्वात मोठा अननस पुरवठादार आहे. तर कॉफी बीन्स आयव्हरी कोस्टमधून येतात. केळी आणि टरबूज ग्वाटेमालामधून येतात तर इंडोनेशिया पाम तेल आणि कोको बटर निर्यात करतो. स्पेन हा रिफाइंड ऑलिव्ह ऑइलचा सर्वात मोठा पुरवठादार आहे, भाजलेली कॉफी स्वित्झर्लंडमधून येते, तांदूळ थायलंडमधून येतो आणि व्हिएतनाम हा मिरपूड आणि काजूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. अमेरिकेने व्हिएतनामवर ४६% कर लादला आहे. युरोपियन देश आयर्लंड अमेरिकेला लोणी पुरवण्यात आघाडीवर आहे, तर ऑलिव्ह ऑइल, खारट डुकराचे मांस आणि चीज इटलीमधून येते. अमेरिकेला होणारा बहुतांश दुधाचा पुरवठा न्यूझीलंडमधून होतो. त्याचप्रमाणे, कोको पावडर नेदरलँड्समधून येते.
भारतातून काय काय आयात करते अमेरिका? -भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, अमेरिका बहुतेक झींगा मसे (लॉबस्टर) भारतातून आयात करते. सरकारी आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये अमेरिकेने भारतातून २,९७,५७१ मेट्रिक टन गोठवलेले कोळंबी आयात केले. या काळात, भारताच्या समुद्री खाद्य निर्यातीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. भारताने २०२३-२४ मध्ये ६०,५२३.८९ कोटी रुपयांचे १७,८१,६०२ मेट्रिक टन सीफूड निर्यात केले. अमेरिकेनंतर, चीन, युरोपियन युनियन, आग्नेय आशिया, जपान आणि मध्य पूर्व ही भारतीय सीफूडची सर्वात मोठी बाजारपेठ आहे.