शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

जे वर्तवलं, ते खरं ठरलं...! 2025 साठीही केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी! कोण आहेत निकोलस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:53 IST

औजुला यांच्या मते, २०२५ मध्ये तिसरे महायुद्ध होणार हे निश्चित आहे. या वर्षी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोक एकमेकांना मारतील अन्......

निकोलस औजुला ही एक अशी व्यक्ती आहे जिने गेल्या दशकात केलेली अनेक भाकिते खरी ठरली आहेत. कोरोनापासून ते ट्रम्प पुन्हा एकदा निवडून येण्यापर्यंत, त्यांची भाकितं खरी ठरली आहेत. त्यांनी या वर्षासाठीही भविष्यवाणी केली आहे. त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच या वर्षात काय होणार हे सांगितले आहे. त्यानी धडकी भरवणारे भाष्य केले आहे. आता त्यांच्या विधानांची तुलना 'भविष्य मालिका' या प्राचीन उडिया पुस्तकातील भाकितांशी केली असता, दोघांचीही भाकितं सारखीच आढळून आली आहेत.  

खरे तर, 'भविष्य मालिका' या पुस्तकातही 2025 हे वर्ष वाईट असल्याचे म्हणण्यात आले आहे. १६ व्या शतकातील या पुस्तकात यावर्षी युद्ध आणि दुष्काळाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. मात्र, निकोलस औजुलाच्या जुन्या अचूक भाकित्यांचा आधार कोणत्याही पुस्तकात आढळत नाही. अशा परिस्थितीत, असे म्हणता येईल की, भविष्य मलिका आणि निकोलस यांचे भाकित वेगवेगळ्या आधारांवर आधारित असू शकतात. मात्र या दोन्ही भाकितांमध्ये २०२५ हे वर्ष विनाशाचे वर्ष असल्याचे म्हटले जात आहे.

औजुला यांची भविष्यवाणी? -औजुला यांच्या मते, २०२५ मध्ये तिसरे महायुद्ध होणार हे निश्चित आहे. या वर्षी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोक एकमेकांना मारतील. राजकीय हत्या होतील. मुसळधार पाऊस पडेल आणि विनाशकारी पूर येईल. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे अनेक शहरे बुडण्याचा धोका निर्माण होईल. महागाई शिगेला पोहोचेल.

औजुला यांनी आपला देश ब्रिटनबसंदर्भातही काही गोष्टी सांगितल्या आहेत. यात, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांचे राजकीय पतन आणि ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि हॅरी यांच्यातील समेट यांचा समावेश आहे.

कोण आहेत निकोलस औजुला? -३८ वर्षीय निकोलस औजुला लंडनमधील हिप्नोथेरपिस्ट आहेत. ते  १७ वर्षांचे असल्यापासून त्यांना काही स्वप्न पडत होती आणि त्या आधारे ते भविष्यवाणी करत होते. औजुला यांनी स्वतः कोरोना महामारी, अमेरिकेतील ब्लॅक लाईव्हज मॅटर चळवळ, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये वाढ, फ्रान्समधील नोट्रे डेम आग आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय यासारखी भाकितं केली होती, जी खरी ठरली आहेत.

टॅग्स :warयुद्धEnglandइंग्लंड