शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

व्हिटो पावर म्हणजे काय ? चीनला कसा मिळाला हा विशेषाधिकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 13:03 IST

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाचा एक मुख्य भाग आहे. या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते. एकूण 15 सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य तर 10 अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो

नवी दिल्ली - पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं आहे. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता

व्हिटो पावर म्हणजे काय ?संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्र संघाचा एक मुख्य भाग आहे. या सुरक्षा समितीवर जागतिक सुरक्षा आणि शांतता राखण्याची जबाबदारी असते. एकूण 15 सदस्य असणाऱ्या या सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य तर 10 अस्थायी सदस्यांचा सहभाग असतो.  संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेत कोणताही प्रस्ताव पारित करण्यासाठी 9 मतांची गरज असते. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या नियमांनुसार प्रस्ताव पारित करण्यासाठी लागणाऱ्या 9 मतांपैकी एक मत हे स्थायी सदस्यांनी संमतीने घेतलेल्या एका मतावर अवलंबून असतं. या स्थायी सदस्यांना कोणत्याही प्रस्तावाला नाकारण्याचा अधिकार देण्यात आलेला असतो. ही व्हिटो पावर म्हणजे नकाराधिकार 

अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व चीन ही पाच राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थायी सदस्य आहेत. दहा अस्थायी सदस्य राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते. सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांना नकाराधिकार असतो. कोणत्याही निर्णयात या पाच राष्ट्रांचा होकार असावा लागतो.यांपैकी एकाही राष्ट्राने संमती न दिल्यास निर्णय फेटाळला जातो. 

1950 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्य होण्याची संधी मिळाली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ही संधी नाकारल्यामुळे भारत ऐवजी चीनला स्थायी सदस्य म्हणून संधी मिळाली. अनेक वेळा भारताने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य होण्यासाठी प्रयत्न केले मात्र मोठ्या देशांचा पाठिंबा असूनही त्याला यश आले नाही. 

चीनने याआधी 2009, 2016 आणि 2017 या साली मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला व्हिटो पावरचा वापर करुन विरोध केला होता

मसूद अझहरला बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या 1267 अलकायदा प्रतिबंध समितीमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारीला आणला होता. 2017 मध्येही चीनने अजहर जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं. मसूद अझहरला पाठिशी घालण्याचे काम चीन नेहमी करत आलाय. त्यावेळी चीनने मसूद अजहर आजारी असून आता तो कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी नसल्याचं सांगितले होते.

टॅग्स :Indiaभारतchinaचीनpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदmasood azharमसूद अजहर