शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये ५ वर्षातून एकदा भरते गढीमाई जत्रा, लाखो जनावरांचा दिला जातो बळी; काय आहे प्रथा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:28 IST

Gadhimai Festival : १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला.

Gadhimai Festival :  नेपाळमधील बारा जिल्ह्यातील गढीमाई देवी याठिकाणी दर पाच वर्षांनी एकदा जत्रा भरते. या जत्रेत अडीच लाख ते पाच लाख जनावरांचा बळी दिला जातो. मात्र, यंदाच्या यात्रेत सशस्त्र सीमा दल व स्थानिक प्रशासनाने जनावरांना वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यावेळी ८ आणि ९ डिसेंबर या दोन दिवसांत ४२०० म्हशींचा बळी देण्यात आला. तर दुसरीकडे, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे म्हैस, मेंढ्या, शेळ्या व इतर जनावरांचा समावेश असलेल्या ७५० जनावरांना वाचवण्यात यश आले आहे. या प्राण्यांना भारतात गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स ग्रुपच्या वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.

बारा जिल्ह्यातील गढीमाई शहरात असलेल्या प्रसिद्ध गढीमाई मंदिरात दर पाच वर्षांनी आयोजित करण्यात येणाऱ्या जत्रेचे उद्घाटन २ डिसेंबर रोजी नेपाळचे उपराष्ट्रपती राम सहाय यादव यांच्या हस्ते करण्यात आले. ही जत्रा १५ डिसेंबरपर्यंत चालली. ८ डिसेंबर रोजी एक विशेष पूजा झाली आणि त्यानंतर ज्या लोकांचा नवस पूर्ण झाला, त्यांनी आपल्या नवसानुसार पशु-पक्ष्यांचा बळी दिला.

पारंपरिक मान्यतेनुसार, गढीमाई मंदिराचे संस्थापक भगवान चौधरी यांना स्वप्न पडले की होते, तुरुंगातून मुक्त होण्यासाठी माता बलिदान मागत आहे. यानंतर पुजाऱ्याने जनावराचा बळी दिला. तेव्हापासून लोक आपल्या इच्छेने येथे येतात आणि जनावरांचा बळी देतात. गढीमाईचा हा उत्सव २६५ वर्षांपासून होत असल्याचे सांगितले जाते. 

नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये पशुबळी बंद करण्याचे आदेश दिले होते. जाणकारांचे म्हणणे आहे की, लोक गढीमाईच्या मंदिरात नैवेद्य देतात, जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते. जगातील सर्वात जास्त यज्ञ याच मंदिरात होतात. बळी देण्यासाठी बहुतेक प्राणी खरेदी केले जातात. सर्वात मोठा सामूहिक यज्ञ विधी म्हणून गढीमाई जत्रेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

प्रथेविरोधात आवाज उठवला जातोयनेपाळशिवाय भूतान, बांगलादेश आणि भारतासह अनेक देशांतून अनेक भाविक या जत्रेला भेट देतात. जगातील अनेक देशांमध्ये याा बळीच्या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. भारतातही या प्रथेविरोधात आवाज उठवला जात आहे. हे प्रकरण नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले आहे. २०१९ मध्ये, न्यायालयाने पशू बलिदानावर तात्काळ बंदी घालण्यास नकार दिला होता, परंतु आदेशात म्हटले होते की, गढीमाई जत्रेदरम्यान पशुबलिदान हळूहळू कमी केले जावे. मात्र, हे धार्मिक श्रद्धेशी निगडीत आहे, त्यामुळे याच्याशी संबंधित लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते.

टॅग्स :NepalनेपाळInternationalआंतरराष्ट्रीयIndiaभारत