शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाशातला कचरा माणसासाठीही धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 04:09 IST

शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा

पृथ्वीप्रमाणेच कचऱ्याची समस्या आता अवकाशातही जाणवू लागली आहे. अवकाशात पृथ्वीभोवती इतका कचरा वाढू लागला आहे की, त्यासाठी मोहीम सुरू करावी लागली आहे. शास्रज्ञांच्या अंदाजानुसार पृथ्वीभोवती सात हजार ६०० टन अवकाश कचरा आहे.या कचऱ्याचा धोका काय?समजा कचऱ्याचा छोटा तुकडा अवकाशात एखाद्या उपग्रहाला लागला तर त्या उपग्रहाचे हजारो तुकडे होऊ शकतात. एवढेच नाही तर त्या उपग्रहाची गती २५ हजार किलोमीटर प्रति तास एवढी वाढण्याचाही धोका आहे. या वेगाने अवकाशात फिरणारे उपग्रहाचे तुकडे इतरही उपग्रहांना धोकादायक ठरू शकतात. हे तुकडे मानव असलेल्या अवकाशयानाला धडकल्यास काय होईल, याचा विचारच न केलेला बरा.कचरा तयार कसा होतो?आता अवकाशात उपग्रह सोडण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. खासगी कंपन्याही उपग्रह पाठवू लागल्या आहेत. उपग्रह अवकाशात पोहोचवण्यासाठी लागणारे रॉकेट्स आणि त्याचे भाग मग सहसा पृथ्वीवर परत येत नाहीत. ते पृथ्वीभोवतीच फिरत राहतात. त्यामुळे साहजिकच जितके जास्त रॉकेट अवकाशात जातील, तितका कचरा जास्त कचरा वाढत जाणार.वापरात नसलेल्या उपग्रहांचाही धोकाअवकाशात उपग्रह पाठवल्यानंतर तो सहसा १० ते १५ वर्षे काम करत असतो. त्यानंतर तो निकामी होतो. पण तो अवकाशातच फिरत राहतो. शिवाय काही उपग्रह अवकाशात गेल्यानंतर अयशस्वी होतात. त्यामुळे तेही फिरत असतातच. त्यामुळे जितके उपग्रह अवकाशात जातील, तितका धोका वाढत जाणार आहे.