शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचं ग्रीन कार्ड असताना कोरोनामुळे वर्षभरापेक्षा अधिक काळ भारतात अडकला असल्यास काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 22:33 IST

कोरोना संकटामुळे अनेक ग्रीन कार्डधारक भारतात अडकले आहेत. त्यांनी काय करावं?

प्रश्न- माझ्याकडे अमेरिकेचं ग्रीन कार्ड असून मी कोरोना संकटामुळे वर्षभराहून अधिक काळ भारतात अडकलोय. मी काय करावं?उत्तर: आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या परिस्थितीमुळे अमेरिकेचे ग्रीन कार्डधारक जगभरात अडकले आहेत. तुम्हाला अमेरिकेत परतून पुन्हा अमेरिकेचं कायमचं नागरिक व्हायचं असल्यास, तुम्हाला रिटर्निंग रेसिडंट (एसबी-१) इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होते.टप्पा १: रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी अर्ज करा.http://www.ustraveldocs.com/in वर जाऊन दूतावासाकडून ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्या. दूतावासासमोर हजर राहताना तुमच्याकडे योग्य कागदपत्रं असायला हवीत. तुम्हाला रिटर्निंग अर्जाचं शुल्क (१८० डॉलर) भरावं लागेल. त्यानंतर डीएस-११७ अर्ज भरा. मुलाखतीसाठी येताना तुमच्यासोबत सर्व सहाय्यक कागदपत्रं घेऊन जा. दूतावासातील अधिकारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करून तुम्ही रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी पात्र आहात की नाही ते ठरवेल. यासाठी पात्र असल्यास तुम्ही इमिग्रंट व्हिसासाठीदेखील पात्र ठरता. यानंतर तुम्ही रिटर्निंग रेसिडंटसाठी (एसबी-१) अर्ज करू शकता.टप्पा २: एसबी-१ इमिग्रंट व्हिसासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटची वेळ घ्यारिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी तुमचा अर्ज मंजूर झाल्यास, तुम्ही http://www.ustraveldocs.com/in वर जाऊन एसबी-१ इमिग्रंट व्हिसाच्या अंतर्गत ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊ शकता.या मुलाखतीला जाताना तुम्ही खालील कागदपत्रं घेऊन या:१. रिटर्निंग रेडिडंट व्हिसासाठी तुम्ही शुल्क (२०५ डॉलर) भरायला हवं.२. https://ceac.state.gov/ceac वर जाऊन डीएस-२६० अर्ज भरा आणि मुलाखतीला जाताना कन्फर्मेशन पेजची प्रिंट आऊट घेऊन या.३. पासपोर्टची मूळ प्रत घेऊन या.४. तुमचे दोन फोटो घेऊन या.५. स्थानिक पासपोर्ट कार्यालयातून पोलिसांचं मंजुरी प्रमाणपत्र घेऊन या.६. मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी पूर्ण करा. या डॉक्टरांची यादी https://in.usembassy.gov/visas/immigrant-visas/ वर उपलब्ध आहे.७. यासोबतच आवश्यक असलेली इतर कागदपत्रं घेऊन या.

रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठीचा अर्ज, फॉर्म डीएस-११७ आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केल्यावर दूतावासातील कर्मचारी तुम्ही रिटर्निंग रेसिडंट स्टेटससाठी पात्र ठरता की नाही ते ठरवतो. तुम्ही येत असलेल्या देशात तुमचं निवासस्थान आहे का या आधारावर तम्हाला नॉनइमिग्रंट व्हिसा मिळणार की नाही ते ठरतं. तुम्हाला पुरेसे पुरावे सादर करता न आल्यास तुम्हाला सारख्याच आधारावर सारख्याच श्रेणीत इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागू शकतो.