शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभराहून जास्त काळ परदेशात असलेल्या ग्रीन कार्डधारकानं अमेरिकेत कसं परतावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 12:01 IST

कायदेशीर कायमस्वरुपी सदस्यांनी (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकांनी ३६५ दिवसांत किंवा रि-एंट्री परवाना वैध असेपर्यंत अमेरिकेत परतावं या नियमांत कोणताही बदल झालेला नाही.

प्रश्न- मी अमेरिकेचा कायदेशीर कायमस्वरुपी नागरिक आहे. माझं ग्रीन कार्ड अद्याप वैध आहे. पण मी गेल्या वर्षभराहून जास्त काळ अमेरिकेत राहतोय. माझ्याकडे रि-एंट्री परवाना नाही. मला अमेरिकेला परत जाता आलं नाही. मी काय करावं?उत्तर- कायदेशीर कायमस्वरुपी सदस्यांनी (एलपीआर) म्हणजेच ग्रीन कार्डधारकांनी ३६५ दिवसांत किंवा रि-एंट्री परवाना वैध असेपर्यंत अमेरिकेत परतावं या नियमांत कोणताही बदल झालेला नाही. या कालावधीत न परतलेल्या कायदेशीर कायमस्वरुपी नागरिकांना अमेरिकेत येण्यासाठी नवा इमिग्रंट व्हिसा लागतो. सध्याच्या नियमांनुसार कायदेशीर कायमस्वरुपी नागरिकांना रि-एंट्री परवान्यासाठी अर्ज करता येत नाही. हा परवाना तुम्ही अमेरिका सोडून परदेशी जाण्याआधीच घ्यावा लागतो.व्हिसासाठी मुलाखत सुरू झाल्यावर तुम्ही रिटर्निंग रेसिडंट (एसबी-१) इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करू शकता. ही दोन टप्प्यांमधील प्रक्रिया आहे. तुम्ही अमेरिकेला नागरिक म्हणून परत जाण्यास पात्र आहेत, याची खातरजमा पहिल्या मुलाखतीमधून होते. या मुलाखतीसाठी तुमचं कायमस्वरुपी नागरिक ओळखपत्र, पूर्ण भरलेला डीएस-११७ अर्ज आणि उपलब्ध असल्यास तुमचा रि-एंट्री परवाना आवश्यक असतो. तुमचा अमेरिकेला परतण्याचा हेतू स्पष्ट करणारी आणि तुम्ही अमेरिकेला परतू न शकलात याचे पुरावे दाखवणारी कागदपत्रंदेखील दाखवू शकता.तुम्ही अमेरिका सोडताना कायदेशीर कायमस्वरूपी नागरिक होतात आणि तुम्ही अमेरिकेला परतण्याच्या हेतूनं प्रयत्न केलात, मात्र तो हेतू पूर्णत्वास जाऊ शकला नाही, हे तुम्हाला पटवून द्यावं लागतं. तुमचा परदेशातील मुक्काम तात्पुरत्या स्वरूपाचा होता आणि त्यामागील कारण तुमच्या नियंत्रणाबाहेरचं होतं. त्यामुळे त्यासाठी तुम्ही जबाबदार नाहीत, हे तुम्हाला पटवून द्यावं लागतं.अमेरिकेत परतण्यासाठीचा अर्ज दूतावासातील अधिकाऱ्यानं स्विकारल्यास तुम्हाला दिलेल्या तारखेला व्हिसा मुलाखतीसाठी जावं लागेल. मुलाखतीआधी वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. यासोबत तुम्हाला इमिग्रंट व्हिसा आणि एलियन रजिस्ट्रेशन अर्जदेखील (डीएस-२६० अर्ज) भरावा लागेल. तुमच्या पहिल्या मुलाखतीवेळी, दूतावासातील अधिकारी तुम्हाला व्हिसा मुलाखतीवेळी आवश्यक असलेल्या नागरी कागदपत्रांची माहिती देईल. मात्र त्याला मान्यता मिळेल याची खात्री नाही.नेहमीच्या व्हिसासंबंधी कामासाठी दूतावास सध्या बंद आहे. दूतावासातील कामकाज केव्हा सुरू होईल, याची माहिती आम्ही आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देऊ. याबद्दल तुम्हाला अधिक काही प्रश्न असल्यास support-india@ustraveldocs.com वर ईमेल करा. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा