शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करायचाय?; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 08:56 IST

अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सरळ आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन सुरू होते आणि अमेरिकेच्या दूतावासात कॉऊन्सिलर ऑफिसरनं मुलाखत घेतल्यानंतर संपते. 

प्रश्न- मला अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठीची प्रक्रिया कशी आहे?

उत्तर- अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सरळ आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन सुरू होते आणि अमेरिकेच्या दूतावासात कॉऊन्सिलर ऑफिसरनं मुलाखत घेतल्यानंतर संपते. तुमच्या प्रवासाच्या हेतूनुसार योग्य त्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करा. B1/B2 व्हिसाचा वापर फिरण्यासाठी, कुटुंबाला भेटण्यासाठी, प्रोफेशनल कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी करता येतो. याबद्दलची अधिक माहिती https://www.ustraveldocs.com/in/in-niv-typeb1b2.asp वर उपलब्ध आहे.तुम्ही प्रथम नॉनइमिग्रंट व्हिसा इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन (डीएस-160) फॉर्म ऑनलाइन भरायला हवा. यामधील सर्व प्रश्नांची उत्तर योग्य आणि अचूक असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही या फॉर्मवर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करता, त्यावेळी फॉर्ममधील माहिती खरी असल्याची कबुली तुमच्याकडून दिली जाते. यानंतर तुम्हाला ऑनलाइन प्रोफाईल तयार करून व्हिसा ऍप्लिकेशनसाठी आवश्यक शुल्क भरावं लागतं. सध्या भराव्या लागणाऱ्या शुल्काची रक्कम आणि शुल्क भरण्याच्या पद्धती याबद्दलची माहिती http://cdn.ustraveldocs.com/in/in-niv-visafeeinfo.asp वर उपलब्ध आहे. यानंतर तुम्ही दोन अपॉईंटमेंट निश्चित करू शकता. यातील पहिली अपॉईंटमेंट व्हिसा ऍप्लिकेशन सेंटरसाठी (व्हीएसी) असेल. व्हीएसीमध्ये तुमच्या हातांचे ठसे आणि तुमचा फोटो घेतला जातो. यानंतर दुसरी अपॉईंटमेंट अमेरिकेच्या दूतावासाची किंवा वकिलातीची असते. याठिकाणी व्हिसासाठी तुमची मुलाखत घेतली जाते. व्हीएसी अपॉईंटमेंट पूर्ण झाल्यावर किमान एका दिवसानंतर आणि कमाल 50 दिवसांआधी तुम्ही अमेरिकेच्या दुतावासात/वकिलातीत मुलाखतीसाठी वेळ मागू शकता.तुमच्या व्हिसा मुलाखतीच्या दिवशी दुतावासात/वकिलातीत दिलेल्या वेळेच्या 15 मिनिटांपेक्षा जास्त आधी पोहोचू नका. यानंतर हातांचे ठसे देण्यासाठी रांगेत उभे राहा. यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी काऊन्सिलर ऑफिसरकडे स्वतंत्र रांगेत उभे राहावे लागेल. बहुतांश मुलाखती काही मिनिटांत पूर्ण होतात. त्यावेळी तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न विचारले जातील. त्यासाठी तयार राहा. काऊन्सिर ऑफिसर तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल, कुटुंबाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करत असाल, तरीही तुम्ही योग्य आणि प्रामाणिकपणे उत्तरं देणं गरजेचं आहे. तुमचा व्हिसा कामकाजाच्या काही दिवसांत तयार होतो. तुम्ही ऑनलाइन प्रोफाइल तयार करताना ज्या पद्धतीची निवड केली, त्यानुसार तुमचा व्हिसा आणि पासपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. जोपर्यंत व्हिसा आणि पासपोर्ट तुमच्या हाती पडत नाही, तोपर्यंत प्रवास निश्चित करू नका.  

टॅग्स :AmericaअमेरिकाUnited StatesअमेरिकाVisaव्हिसा