शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऋषी सुनक यांच्या पेनमध्ये काय आहे खास? ज्यामुळे ब्रिटनमध्ये निर्माण झालाय वाद; विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 22:20 IST

यासंदर्भात पीएम हाऊसने स्पष्टिकरण देत, ऋषी सुनक या पेनचा वापर करत नाही, असे म्हटले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधानऋषी सुनक हे त्यांच्या एका पेनमुळे वादात सापडले आहेत. सुनक आपल्या दैनंदिन कामात एका अशा पेनचा वापर करतात, ज्या पेनने लिहिलेले पुसलेही जाऊ शकते. या पेनमध्ये विशेष प्रकारची शाई वापरण्यात आली आहे, जी आवष्यकता भासल्यास पुसलीही जाऊ शकते. यासंदर्भात द गार्डियन या वृत्तपत्राने खुलासा केला असून, गोपनीयतेच्या दृष्टीनेही हे धोकादायक असल्याचेही म्हटले आहे.

संबंधित वृत्तात म्हणण्यात आले आहे की, ऋषी सुनक टीव्ही अथवा इतर फोटोग्राफमध्ये ‘पायलट-व्ही’ पेनचा वापर करताना दिसून आले आहेत. या पेनने लिहिलेले शब्द पुसलेही जाऊ शकतात. सुनक या पेनद्वारे आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान कॅबिनेट नोट्स, सरकारी कागदपत्रे आदींवर स्वाक्षरी करताना दिसून आले आहेत. या पेनवर, लिहिलेले मिटवले जाऊ शकते, हे दर्शवणारा 'लोगो'ही (ट्रेडमार्क) आहे. कंपनीच्या वतीने याचे मार्केटिंग करताना, जे लोक शाईने लिहिण्याचा सराव करतात त्यांच्यासाठी हा पेन अत्यंत उपयुक्त आहे, कारण आपल्याकडून चूक झाली, तर लिहिलेले पुसलेही जाऊ शकते, असे म्हणण्यात आले आहे.

पीएम हाऊसचं स्पष्टिकरण -यासंदर्भात पीएम हाऊसने स्पष्टिकरण देत, ऋषी सुनक या पेनचा वापर करत नाही, असे म्हटले आहे. ‘अशा प्रकारच्या पेनचा वापर सर्वसाधारणपणे सिव्हिल सेवेशी संबंधित लोक करत असतात. पंतप्रधान याचा वापर करत नाहीत,’ असे प्रेस सेक्रेटरीने म्हटले आहे.

विरोधकांचा निशाणा - संबंधित वृत्तावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्ष असलेल्या लिबरल डेमोक्रेट पार्टीचे नेते टॉम ब्रेक म्हणाले, जेव्हा राजकारणात विश्‍वास सर्वात खालच्या पातळीवर असतो, तेव्हा पंतप्रधानांकडून सरकारी कागदपत्रांवर अशा प्रकारचा पेन वापरण्याची घटना, तो विश्वास फ्लोअरवरून बेसमेंटमध्ये ढकलून देते.

टॅग्स :Rishi Sunakऋषी सुनकEnglandइंग्लंडprime ministerपंतप्रधान