शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

PM मोदींनी फ्रान्सच्या अध्यक्षांना मिठी मारताच 'त्या' VIDEOवरुन काढला चिमटा; मॅक्रॉन हसतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:09 IST

जी-७ बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन समोरासमोर आले तेव्हा दोघांनीही एकमेकांना मिठी मारली.

PM Modi Meet Emmanuel Macron: कॅनडातील कनानास्किस येथे सुरू असलेल्या ५१ व्या जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कॅनड, दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या प्रमुखांची भेट घेतली. यावेळी भारत आणि फ्रान्समधील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन समोरासमोर आले तेव्हा दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांची फिरकी घेतली आणि दोघांनाही हसू अनावर झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कॅनडातील कनानास्किस येथे सुरू असलेल्या जी-७ शिखर परिषदेदरम्यान भारत आणि फ्रान्समधील मैत्रीची झलक पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन समोरासमोर आले तेव्हा त्यांच्यात हसतच चर्चेला सुरुवात झाली. दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आणि हलकेच हसले.  राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा नेहमीच आनंददायी असते असं पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र यावेळी पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन चिमटा काढला ज्यावरुन दोघेही खळखळून हसले.

पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन पाहुण्यांनी भरलेल्या एका हॉलमध्ये एकमेकांना भेटले. त्यांच्या नेहमीच्या शैलीत, पंतप्रधान मोदी यांनी आधी मॅक्रॉन यांना  मिठी मारली. त्यानंतर, बोलताना ते म्हणतात की आजकाल तुम्ही ट्विटरवर खूप ट्रेंड होताय. पंतप्रधान मोदींनी इतकेच सांगितले आणि मॅक्रॉन यांना हसू आवरता आले नाही. त्यानंतर पंतप्रधान मोदीही मोठ्याने हसले.

पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना मारलेल्या टोमण्याचा किस्सा खूपच रंजक आहे. गेल्या महिन्यात मॅक्रॉन त्यांच्या पत्नी ब्रिजिटसोबत व्हिएतनामच्या दौऱ्यावर होते. व्हिएतनाममधील हनोई येथे विमानातून उतरण्यापूर्वी, ब्रिजिट यांनी विमानाच्या दारावरच मॅक्रॉन यांच्या गालावर जोरात फटका मारला. एका अधिकाऱ्याने विमानाचे दार उघडताच, ब्रिजिटने त्यांनी फटका मारला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणातच व्हायरल झाली. नंतर मॅक्रॉननेही यावर स्पष्टीकरण दिले. आम्ही दोघेही फक्त मस्करी करत होतो. लोक तेवढंच मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मॅक्रॉन म्हणाले होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यातील द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी हवामान बदल, जागतिक सुरक्षा, तांत्रिक सहकार्य आणि अनेक संवेदनशील विषयांसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सIndiaभारत