शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

डोनाल्ड ट्रम्प यांचे भवितव्य काय? महाभियोगातून बचावले, पण कोर्टात खेचण्याची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 05:57 IST

Donald Trump : ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यासाठी सेनेटमध्ये ६७ मतांची गरज होती. ५७ विरूद्ध ४३ अशा मताधिक्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या अग्निपरीक्षेतून जाण्यापासून दुसऱ्यांदा वाचले असले तरी त्यांच्याविरोधातील असंतोष एवढा आहे की, ट्रम्प यांना कोर्टात खेचा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. अध्यक्षपदी असताना काही विशेष नियमांचे, कायद्यांचे कवच ट्रम्प यांना लाभले होते. मात्र, आता अध्यक्षपदावरून उतरल्यानंतर त्यांच्यावर सामान्य नागरिकाप्रमाणे कारवाई केली जाऊ शकते, असा सूर उमटू लागला असून राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू झाली आहे. 

ट्रम्प यांच्यावर आरोप काय?

कॅपिटॉल हिल या अमेरिकी संसदेच्या इमारतीवर हल्ला करण्यासाठी समर्थकांना चिथावले, हा मुख्य आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. ६ जानेवारी रोजी हा हल्ला झाला होता. त्यात एका पोलिसासह पाच जण ठार झाले होते

ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यासाठी सेनेटमध्ये ६७ मतांची गरज होती. ५७ विरूद्ध ४३ अशा मताधिक्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या सात सिनेटर्सनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता.सेनेटमध्येच प्रस्ताव फेटाळला गेल्याने लोकप्रतिनिधीगृहात हा प्रस्ताव येऊ शकला नाही.

आता पुढे काय?

- ट्रम्प यांच्यावर कोर्टात खटला दाखल करता येऊ शकतो. - केवळ कॅपिटॉल हिलवरील हल्ला, हे एकच प्रकरण नव्हे तर अनेक प्रकरणांवरून ट्रम्प यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.- अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान जॉर्जियातील निवडणूक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणीही ट्रम्प यांच्यावर खटला सुरू आहे.- कॅपिटॉल हिलवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांकडूनही ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो.- कथित आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोपही ट्रम्प यांच्यावर आहे. 

- कॅपिटॉल हिल हल्ला प्रकरणावेळी ट्रम्प काय करत होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु याप्रकरणी आतापर्यंत शेकडो लोकांची धरपकड झाली आहे.- माजी अध्यक्षांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणे वेगवेगळ्या राज्यांत नोंद असतील तर ते एकत्रित करून मध्यवर्ती न्यायव्यवस्थेकडे वर्ग केले जाऊ शकतात. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका