शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

US Visa: अमेरिकेचा वैध व्हिसा असलेला पासपोर्ट चोरीला गेल्यास काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 11:09 IST

what to do after passport with valid US visa got stolen: अमेरिकेचा वैध व्हिसा हरवल्यास, गहाळ झाल्यास काय करावं; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

प्रश्न: माझा पासपोर्ट चोरीला गेला आहे. त्यात अमेरिकेचा वैध व्हिसा होता. आता मी काय करावं? माझ्या हरवलेल्या व्हिसाची तक्रार कशी करावी?उत्तर: तुम्ही तुमच्या हरवलेल्या पासपोर्टची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि अमेरिकन दूतावासाला द्यावी. तुमची ओळख सुरक्षित राखण्यासाठी आणि अमेरिकेच्या नव्या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी हरवलेल्या व्हिसाची माहिती देणं गरजेचं आहे. (what to do after passport with valid US visa got stolen )सर्वप्रथम घटना घडली तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. नेमकं काय घडलं याची माहिती असणाऱ्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घ्या. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला व्हिसा जारी करणाऱ्या दूतावासाला या घटनेची माहिती द्या. त्यांना पोलीस तक्रारीची प्रत दाखवा. यासाठी तुम्ही india@ustraveldocs.com वर ई-मेलदेखील करू शकता. नेमका काय प्रकार घडला याची माहिती ई-मेलमध्ये द्या. सोबत तुमच्या हरवलेल्या पासपोर्ट, हरवलेल्या व्हिसा आणि पोलीस तक्रारीचे फोटो जोडा.तुम्ही अमेरिकेतच असल्यास, तुम्ही याची माहिती होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटला द्यायला हवी. यानंतर तुम्ही https://www.uscis.gov/i-102 वर जाऊन I-102 अर्ज भरून रिप्लेसमेंट अरायव्हल/डिपार्चर रेकॉर्ड मिळवायला हवा.हरवलेले किंवा चोरीला गेलेले अमेरिकन व्हिसा पुन्हा जारी केले जात नाहीत. तुम्हाला अमेरिकेला प्रवास करायचा असल्यास नव्या नॉनइमिग्रंट व्हिसासाठी पुन्हा अर्ज करावा लागतो आणि व्हिसा अर्ज शुल्क भरावं लागतं. तुम्ही www.ustraveldocs.com/in वर जाऊन नव्या व्हिसासाठी अर्ज करू शकता. नेहमीच्या व्हिसा ऑपरेशन्ससाठी दूतावास सध्या बंद आहे याची नोंद घ्या. याबद्दलची माहिती आमच्या वेबसाईटवर अपडेट केली जाईल. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असल्यास ते india@ustraveldocs.com वर ई-मेल करा. तुम्ही पुढील व्हिसा मुलाखतीला येताना तुमच्या जुन्या पासपोर्टची प्रत (उपलब्ध असल्यास) आणि पासपोर्ट हरवल्याची पोलीस तक्रारीची मूळ प्रत घेऊन या.प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टमधील बायोग्राफिक माहिती असलेल्या पानाची, अमेरिकेच्या व्हिसाची आणि ऍडमिशन स्टॅम्पची प्रत अमेरिकेत आल्यानंतर तयार करावी आणि एका सुरक्षित ठिकाणी ठेवावी असा सल्ला आम्ही देतो.सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा