शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट, अमेरिकेचा वैध व्हिसा चोरीला गेल्यास काय करावं? कुठे तक्रार करावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 12:27 IST

पासपोर्ट, अमेरिकेचा व्हिसा गहाळ झाल्यास नेमकी काय प्रक्रिया करावी; जाणून घ्या

प्रश्न- माझा पासपोर्ट चोरीला गेला असून त्यासोबतच अमेरिकेचा वैध व्हिसादेखील होता. मी आता काय करावं? मी गहाळ झालेल्या व्हिसाची तक्रार कशी नोंदवावी?उत्तर: तुम्ही गहाळ झालेल्या पासपोर्टची माहिती तातडीनं स्थानिक प्रशासनासह अमेरिकेच्या दूतावासाला द्यायला हवी. तुमची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी आणि अमेरिकेच्या नव्या व्हिसासाठी अर्ज करताना कागदपत्रं जमा करतेवेळी त्याची गरज भासते.व्हिसा हरवल्याची तक्रार सर्वप्रथम स्थानिक पोलिसांकडे करा. नेमकी काय घटना घडली, याची माहिती असणाऱ्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घ्या. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तुम्हाला जिथून व्हिसा जारी करण्यात आला, त्या अमेरिकेच्या दूतावासाला किंवा वकिलातीला याची माहिती द्या. यावेळी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीची प्रतदेखील जमा करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही india@ustraveldocs.com वर ई-मेल करू शकता. तुमचा पासपोर्ट, व्हिसा नेमका कसा हरवला, याची सविस्तर माहिती गहाळ झालेल्या पासपोर्टसह आणि व्हिसाच्या फोटोसह ई-मेलमध्ये द्या. याशिवाय एफआयआरची प्रतदेखील सोबत जोडा.तुम्ही अमेरिकेत असल्यास होमलँड सिक्युरिटी विभागाला व्हिसा हरवल्याची माहिती द्या. अरायव्हल/डिपार्चरची माहिती मिळवण्यासाठी https://www.uscis.gov/i-102 वर जाऊन आय-१०२ अर्ज भरा. गहाळ झालेला किंवा चोरीला गेलेला अमेरिकेचा व्हिसा पुन्हा जारी केला जात नाही. तुम्हाला नव्या नॉनइमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. अमेरिकेला प्रवास करायचा असल्यास तुम्हाला व्हिसा अर्ज शुल्क भरावं लागेल. नव्या व्हिसासाठी तुम्ही www.ustraveldocs.com/in संकेतस्थळावर अर्ज करू शकता. सध्या दूतावास व्हिसाच्या दैनंदिन कामांसाठी बंद आहे याची नोंद घ्या. तो कधी सुरू होणार याची माहिती आम्ही संकेतस्थळावर देऊ. तुम्हाला यासंदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया india@ustraveldocs.com वर मेल करा. तुमच्या पुढील व्हिसा मुलाखतीला येताना जुन्या पासपोर्टची प्रत (उपलब्ध असल्यास) आणि पासपोर्ट गहाळ झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी दिलेल्या अहवालाची मूळ प्रत घेऊन या. प्रवाशांनी अमेरिकेत दाखल होताच त्यांची बायोग्राफिक माहिती असलेल्या पासपोर्टमधील पानाची, अमेरिकन व्हिसाची आणि ऍडमिशन स्टॅम्पची एखादी प्रत काढून सुरक्षित ठेवावी, असं आवाहन आम्ही करतो. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा