शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

"हे काय केलं...?" इराणसोबत युद्ध सुरू असतानाच अमेरिका संतापली, इस्रायलनं कुठे केला एवढा भीषण हल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:13 IST

अमेरिकेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युद्धाला इतक्या टोकापर्यंत भडकवणे चुकीचे असून, यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होत असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारीला इराणवर संयुक्त हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटले. मात्र आता एका हल्ल्यावरून अमेरिकाइस्रायलवर संतापल्याचे वृत्त आहे. खरेतर, इस्रायलने इराणच्या तेल डेपोंवर (Oil Depots) केलेल्या एका भीषण हल्ल्याने अमेरिका संतापली आहे. अमेरिकेने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युद्धाला इतक्या टोकापर्यंत भडकवणे चुकीचे असून, यामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास होत असल्याची भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

इस्रायलनं केला असा दावा -मात्र, "ज्या ऑईल फॅसिलिटीजवर हल्ला झाला, त्यांचा वापर क्षेपणास्त्र लाँचर्समध्ये इंधन भरण्यासाठी केला जात होता, असा दावा इस्रायलने केला आहे. पण, 'Axios' च्या वृत्तानुसार, अशा स्वरूपाच्या भीषण हल्ल्याची अपेक्षा अमेरिकेला नव्हती. एका अमेरिकन अधिकाऱ्याने या हल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तर इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते अमेरिकेची प्रतिक्रिया "तुम्ही हे काय केले?" अशा स्वरूपाची आणि धक्कादायक होती.

तेहरानचे संपूर्ण आकाश काळेकट्ट... -महत्वाचे म्हणजे, अमेरिकन अथवा इस्रायली अधिकाऱ्यांनी या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केलेले नाही. इस्रायलच्या या हल्ल्यात तेहरानमधील तीन तेल डेपो आणि एका रिफायनरीचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये एवढा धूर निर्माण झाला की, ते संपूर्ण काळे झाले. आजूबाजूच्या इमारती आणि इतर भागांवर तेलाचा जाड थर जमा झाला आहे, ते साफ करणेही कठीण झाले आहे. शिवाय, आकाशात साचलेला धूर आता हळूहळू वितळत आहे आणि टपकत आहे. यामुळे हवा विषारी झाली आहे. परिस्थिती अशी आहे की लोकांना गंभीर आरोग्य समस्यांना सामेरे जावे लागत आहे. 

नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला -परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तेहरानमधील नागरिकांना मास्क वापरण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिकांच्या मते, तेल डेपोला लागलेली एवढी भीषण होती की, त्यातून आगडोंब उसळत होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Angered by Israel's Iran Attack Amidst Ongoing Conflict

Web Summary : Amidst conflict with Iran, Israel's oil depot attack infuriated the US. Washington expressed strong disapproval, citing civilian harm and escalation risks. Israel claimed the depots fueled missile launchers. Tehran faced severe pollution, prompting health advisories. The attack damaged three oil depots and a refinery.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIsraelइस्रायलIranइराण