शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:31 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडेन यांना कडक इशारा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडेन यांना कडक इशारा दिला आहे. यासोबतच १ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली आहे. हंटर बायडेन यांनी आपल्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध खोटी आणि बदनामीकारक वक्तव्ये केली आहेत, असा आरोप मेलानिया यांनी केला आहे.

"चॅनेल ५ विथ अँड्र्यू कॅलाघन" या यूट्यूब शोमधील अलिकडच्या मुलाखतीत हंटर बायडेन यांनी दावा केला की, जेफ्री एपस्टाईन यांनी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली भेट घडवून आणली होती. हंटर यांचे हे विधान सोशल मीडिया आणि अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाले, ज्यामुळे मेलानिया यांची प्रतिमा खराब झाली.

मेलानिया यांनी दिली कायदेशीर कारवाईमेलानियाच्या वतीने वकील अलेजांद्रो ब्रिटो यांनी ६ ऑगस्ट रोजी हंटर बायडेन आणि त्यांचे वकील अॅबी लोवेल यांना कायदेशीर नोटीस पाठवली. हंटर बायडेन यांनी त्यांचे विधान तात्काळ मागे घ्यावे, सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि संबंधित व्हिडीओ काढून टाकावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. जर, असे केले नाही तर १ अब्ज डॉलर्सचा (सुमारे ८,३०० कोटी रुपये) मानहानीचा खटला दाखल केला जाईल.

ब्रिटो यांनी लिहिले की, "या खोट्या, बदनामीकारक आणि प्रक्षोभक विधानांमुळे मेलानिया ट्रम्प यांना मोठे आर्थिक आणि प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. व्हिडीओ आणि त्यात केलेले दावे जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचले आहेत." ब्रिटो यांनी असाही आरोप केला की, हंटर यांच्या या माहितीचा स्रोत सीरियल फॅब्युलिस्ट मायकेल वुल्फ आहे. अमेरिकेत पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी वातावरण तयार होत असताना हा वाद समोर आला आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प