ढाका - अमेरिकेच्या डिफेन्स टेक्नॉलॉजी सिक्युरिटी एडमिनिस्ट्रेशनचे एक वरिष्ठ सुरक्षा सल्लागार चटगावमध्ये बांगलादेशच्या नौदल तळावर दिसले. याठिकाणी अमेरिकन अधिकाऱ्याने नौदल कमांडर एडमिरल एम मोयनुल हसन यांची भेट घेतली. २७ जानेवारीला ही भेट झाली. अमेरिकाबांगलादेशला दुहेरी वापराच्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामध्ये दारूगोळा समाविष्ट असू शकतो असं मानलं जात आहे.
चटगाव पोर्ट हा भारतीय सीमेच्या अगदी जवळ आहे. आपण नकाशात ते पाहू शकता. माहितीनुसार, DTSA चे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार स्टीवन बैरी जेम्स यांनी चटगाव नेवर एरियाचे कमांडर रियर एडमिरल हसन यांची भेट घेतली. या भेटीनंतर बांगलादेशी अधिकारी त्यांना घेऊन चटगाव ड्राय डॉक लिमिटेडवर घेऊन गेले. ज्याठिकाणी लेफ्टनंट कमांडर जाहीद मोहसिन कबीर यांनी भविष्यातील ऑपरेशन्स, बांगलादेशाची नौदल क्षमता आणि पुढील प्रकल्पाबाबत माहिती दिली.
सर्वात रंजक बाब म्हणजे जो बांगलादेश अमेरिकन अधिकाऱ्याच्या दौऱ्याचा सोशल मीडियावर गाजावाजा करते. त्यांनी स्टीवन बैरी जेम्स यांच्या दौऱ्याची काहीच माहिती शेअर केली नाही. अमेरिकेची DTSA संस्था पुर्नवापराच्या गोष्टी, दारूगोळा एक्सपोर्ट परवान्याचा आढावा यासाठी एजन्सी म्हणून काम करते. त्याशिवाय एक्सपोर्ट परवान्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक आणि पॉलिसी आधारे रिपोर्ट तयार करते. त्यासाठी ते संरक्षण तंत्रज्ञानाचाही अभ्यास करतात. बांगलादेश सरकारसोबत मिळून ते काही पर्याय विकसित करू शकतात.
दरम्यान, DTSA चा उद्देश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या तंत्रज्ञान आणि माहितीचा प्रसार किंवा गैरवापर रोखणे आहे. DTSA ची स्थापना १९८० च्या दशकात झाली आणि त्याचे उद्दिष्ट अमेरिकेच्या सहयोगी आणि भागीदारांमध्ये तंत्रज्ञान सुरक्षा आणि सामायिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे आणि धोरणात्मक स्पर्धकांच्या तंत्रज्ञान संपादन आणि युक्त्यांना तोंड देणे आहे. याव्यतिरिक्त DTSA प्रगत अमेरिकन शस्त्रे, प्रणाली, उपकरणे आणि तंत्रज्ञान तसेच माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रस्तावित हस्तांतरणाचे देखील मूल्यांकन करते. म्हणून अमेरिका बांगलादेश नौदलाला कोणतेही तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची तयारी करत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारत-EU मुक्त व्यापार करार
याच २७ जानेवारीला भारताने युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. या करारामुळे देशातील प्रत्येक राज्यासाठी जागतिक बाजारपेठेची दारे उघडणारी 'संधी' ठरणार आहे. त्याशिवाय भारताच्या निर्यातीत सुमारे ६.४ लाख कोटी रुपयांची वाढ होण्याचा अंदाज असून, ९,४२५ उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द होणार आहे. या करारांतर्गत जागतिक जीडीपीचा २५ टक्के हिस्सा आणि सुमारे २ अब्ज ग्राहक एवढी विशाल बाजारपेठ एकमेकांशी जोडली गेली आहे. त्यामुळे भारताला २७ युरोपियन देशांच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळून जागतिक पुरवठा साखळीतील भूमिका अधिक बळकट होईल. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि युरोपमधील हा करार धोरणात्मक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. ट्रम्प यांच्यासाठीही हा झटका आहे.
Web Summary : A US defense official visited a Bangladeshi naval base near India, sparking concerns about potential arms sales and technology transfer. The visit, coinciding with an India-EU trade deal, raises questions about regional security dynamics and US strategy in the area.
Web Summary : एक अमेरिकी रक्षा अधिकारी ने भारत के पास बांग्लादेशी नौसेना अड्डे का दौरा किया, जिससे हथियारों की संभावित बिक्री और प्रौद्योगिकी हस्तांतरण को लेकर चिंताएं बढ़ गईं। भारत-यूरोपीय संघ के व्यापार समझौते के साथ यह यात्रा क्षेत्रीय सुरक्षा गतिशीलता और क्षेत्र में अमेरिकी रणनीति के बारे में सवाल उठाती है।