शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याकडे बॉम्ब आहे, बंदूकधारी लाइव्ह शोमध्ये घुसले; इक्वेडोरमध्ये हल्लेखोरांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 13:40 IST

निवेदक आणि कर्मचाऱ्यांना हल्लेखोरांकडून करण्यात आली मारहाण

क्विटो : दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोरमध्ये एका दूरचित्रवाहिनीवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना सशस्त्र गुंडांनी घुसखोरी केली. त्यांनी निवेदकावर बंदूक रोखली. त्यावेळी गोळीबार केल्याचे व लोकांच्या किंकाळ्यांचे आवाजही ऐकायला आले. मात्र त्यात किती जखमी झाले, हे कळू शकलेले नाही. या देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नाओबा यांनी २२ गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर टीसी या दूरचित्रवाहिनीच्या कार्यालयावर या गटांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता आहे. हल्लेखोरांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क घातला होता.

लोकांचे हात बांधले आणि...

  • स्टुडिओत शिरलेल्या हल्लेखोरांपैकी एकाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगत धमकाविले. या हल्लेखोरांनी नागरिक तसेच सुरक्षारक्षकांनाही ठार मारण्याची धमकी दिली.
  • काही लोकांचे हात बांधले व त्यांना जमिनीवर झोपायला सांगितले. पोलिसांना बोलावू नका, असा इशाराही त्यांना दिला.

 

  • ६० दिवसांची आणीबाणी राष्ट्राध्यक्ष नाओबा यांनी देशात जाहीर केली. 
  • २२ गटांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. 
  • १३ सशस्त्र हल्लेखोरांना पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अटक केली. 
  • हल्लेखोरांपैकी एकाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगत धमकाविले. 

तुरुंगातून पळालेल्या फिटो गुंडाची बाहेरही दहशत

गेल्या सोमवारी सगळ्यांत खतरनाक गुन्हेगार ॲडोल्फो मासियास ऊर्फ फिटो कारागृहातून फरार झाला होता. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष नाओबा यांनी देशात ६० दिवसांची आणीबाणी जाहीर केली. फिटोवर अमली पदार्थांची तस्करी, हिंसाचार केल्याचे आरोप आहेत. सरकारच्या आणीबाणीच्या निर्णयानंतर तेथील गुंडांच्या टोळ्या अधिक सक्रिय झाल्या. त्यांतील काही टोळ्यांनी सहा पोलिस अधिकाऱ्यांचेच अपहरण केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी