शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

Narendra Modi in Bangladesh: निवडणूक बंगालमध्ये, PM मोदी बांगलादेशातील मंदिरांमध्ये करतायत पूजा! असा काढला जातोय राजकीय अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 14:15 IST

पंतप्रधान मोदी मंदिर परिसरात येताच शंख वाजवून आणि गंध लावून त्यांचे स्वाग करण्यात आले. यावेळी त्यांनी देवीला एक मुकूट, साडी आणि इतर काही पूजेचे साहित्य अर्पण केले. 'जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून आपण धन्य झालो' असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Narendra Modi Visit at jeshoreshwari kali temple)

ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शुक्रवारपासूनच बांगलादेशच्या (Bangladesh) दोन दिवसीय दौऱ्यांवर आहेत. आज आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली. यासंदर्भात स्वतः पंतप्रधान मोदींनीच ट्विट करून माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, आजच पश्चिम बंगाल विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 30 जागांसाठी मतदान होत आहे. (West bengal assembly elections 2021 Narendra Modi Visit at jeshoreshwari kali temple in bangladesh)

पंतप्रधान मोदी मंदिर परिसरात येताच शंख वाजवून आणि गंध लावून त्यांचे स्वाग करण्यात आले. यावेळी त्यांनी देवीला एक मुकूट, साडी आणि इतर काही पूजेचे साहित्य अर्पण केले. 'जेशोरेश्वरी काली मंदिरात पूजा करून आपण धन्य झालो' असे मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबत मोदींनी आपला मंदिरातील पूजेचा एक व्हिडिओदेखील जोडला आहे. यावेळी मोदींनी मंदिर परिक्रमाही केली.

यावेळी पंतप्रधान मोदींनी देवाला जो मुकूट अर्पण केला, त्या चांदीच्या मुकुटाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. हा मुकूट पारंपरिक कारागिरांनी तीन आठवड्यांत हातांने तयार केला आहे.

ओराकांडी मंदिराला भेट -यानंतर पंतप्रधान मोदींनी बांगलादेशातील मतुआ समाजाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या ठाकूरबाडी म्हणजेच ओराकांडी मंदिरालाही भेट देऊन तेथे पूजा केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजालाही संबोधित केले. 

आज माझी इच्छा पूर्ण झाली - मतुआ समाजाला संबोधित करताना मोदी म्हणाले, मी अनेक वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो. मी 2015 साली बांगलादेश दौऱ्यावर आलो होतो तेव्हा ओरकंडीला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि आज माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे, असे मोदी म्हणाले.

आपल्या दौऱ्यात मोदी सुगंधा शक्तीपीठालाही भेट देणार आहेत. हे हिंदूंच्या 51 शक्तीपीठांपैकी एक असल्याचे मानले जाते.

असा काढला जातोय राजकीय अर्थमोदींच्या बांगलादेशातील मंदिर भेटींकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे. मोदींच्या या मंदिर भेटीचा संबंध पश्चिम बंगालच्या निवडणुकांशीही जोडला जात आहे. एवढेच नाही, तर आज मोदींनी मतुआ समाजाचे संस्थापक हरिचंद्र ठाकूर यांच्या ठाकूरबाडी म्हणजेच ओराकांडी मंदिरालाही भेट देऊन तेथे पूजा केली. बंगालमध्ये मतुआ समुदायाची लोकसंख्या जवळपास दोन कोटी एवढी आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेशWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकPoliticsराजकारण