शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

शाब्बास! बेळगावचे मराठमोळे श्री ठाणेदार झाले अमेरिकेचे आमदार

By हेमंत बावकर | Updated: November 5, 2020 15:05 IST

USElection 2020: पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या जिल्ह्यातून 93 टक्के मते मिळवत विजय मिळविला आहे.

भारतीय वंशाचे अमेरिकेतील करोडपती मिशिगनमधून 93 टक्के मते मिळवत सिनेटर (आमदार) झाले आहेत. डेमोक्रेटिक पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढविली होती. अमेरिकेमध्ये सध्या अध्यक्षीय निवडणुकीचे धुमशान सुरु असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पराभवाच्या छायेत आहेत. तर ज्यो बायडन यांना बहुमतासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. 

या मराठमोळ्या शिलेदाराचे नाव आहे श्री ठाणेदार. ते 65 वर्षांचे असून पेशाने ते संशोधक आणि व्यवसायिक आहेत. त्यांनी सहा जणांना हरवत निवडणूक जिंकली आहे. ठाणेदार हे मुळचे सीमाभागातील बेळगावचे आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बीएससी केमिस्ट्री आणि मास्टर डिग्री मिळविलेली आहे. 1979 मध्ये ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले होते. तिथेच ते स्थायिक झाले. ठाणेदार हे उत्तम मराठी बोलतात. त्यांची अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ठाणेदार यांनी मिशिगनच्या तिसऱ्या जिल्ह्यातून 93 टक्के मते मिळत विजय मिळविला आहे. ठाणेदार यांनी 2018 मध्ये गव्हर्नर व्हाईटमर आणि अब्दुल सईद यांना मागे काढण्यासाठी 10 दशलक्ष डॉलर खर्च केले होते. मात्र, त्यांना डेट्रॉईटमध्ये जास्त मते मिळाली. 2018 मध्ये त्यांचे "Shri for We" या टीव्हीवरील अॅड गाजल्या होत्या. त्यावर त्यांनी मोठा खर्चही केला होता. 

US Election 2020 Results Live : ज्यो बायडन विजयाच्या जवळ; म्हणाले - निश्चितपणे विजयी होतोय

विजयानंतर ठाणेदार यांनी सांगितले की, आपल्या मतदारसंघात समस्यांची मोठी यादी असून त्या दूर करायच्या आहेत. यामध्ये पाण्याची समस्या, बेरोजगारी आदी मोठ्या समस्या आहेत. गेल्या काही काळापासून काहीच बदलले नसल्याने लोकांनीही आशा सोडली आहे. लोक मूलभत सुविधांपासून वंचित आहेत.

काय होतेय अमेरिकेत?अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक हा संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा विषय असतो. या महासत्तेच्या अध्यक्षपदी कोण निवडून येणार यावर जागतिक राजकारणाचा पट अवलंबून असतो. सर्वशक्तिमान राष्ट्राच्या अध्यक्षपदाच्य निवडणुकीची उत्कंठा सर्वांनाच आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बुधवारी सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी अद्याप सुरूच आहे. सध्याच्या घडीला डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) आघाडीवर आहेत. तर विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर पडले आहेत. 

ज्यो बायडन अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल मतांच्या जादुई आकड्याच्या जवळ पोहोचले आहेत. ज्यो बायडन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. या अध्यक्षपदासाठी २७० इलेक्टोरल मतं मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यो बायडन यांना विजय मिळविण्यासाठी फक्त आणखी सहा इलेक्टोरल मतं गरजेची आहेत.

टॅग्स :AmericaअमेरिकाUS ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पJoe Bidenज्यो बायडनbelgaonबेळगाव