अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या संघर्षाला आता आठवडा उलटत आला आहे. या काळात दोन्ही देशांनी इराणवर केलेल्या भीषण बॉम्बवर्षावामध्ये इराणची प्रचंड हानी झाली आहे. एवढंच नाही तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचाही अमेरिका आणि इस्राइलने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. मात्र त्यानंतरही इराणने माघार न घेता संघर्ष सुरू ठेवला आहे. तसेच आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांसह इस्राइलला वारंवार लक्ष्य केले आहे. या संघर्षादरम्यान, आता इराणने थेट अमेरिकेला आव्हान देत अखेरची गोळी शिल्लक असेपर्यंत आणि शेवटचा सैनिक जिवंत असेपर्यंत लढण्याची घोषणा केली आहे.
अमेरिका आणि इस्राइलसोबतचा संघर्ष अधिकाधिक तीव्र होत असल्याने आखाती देशांमधील स्थिती अधिकाधिक स्फोटक होत आहे. या दरम्यान, इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी नवी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे. अमेरिका आणि इस्राइलकडून होत असलेल्या हल्ल्यांविरोधात वीरतापूर्वक राष्ट्रवादी बचाव करण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. आमचा देश शेवटची गोळी आणि शेवटचा सैनिक जिवंत असेपर्यंत संघर्ष करेल, असेही खतीबजादेह यांनी सांगितले.
इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातिबजादेह सध्या नवी दिल्लीमध्ये उपस्थित असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अमेरिकेच्या धोरणावर टीका केली. त्यांनी म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कचे महापौर निवडू शकत नाहीत, मग ते इराणचा सर्वोच्च नेता कसा निवडू शकतात? त्यांनी पुढे अमेरिकेच्या भूमिकेला ‘औपनिवेशिक दृष्टीकोन’ असे संबोधले आणि इराणमधील लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा आरोप केला.
दरम्यान,भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे उपपरराष्ट्र मंत्री सईद खातिबजादेह यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Web Summary : Despite heavy losses and leader's death, Iran vows to continue fighting America and Israel until the last soldier and bullet. Iran criticizes US policies, calling them 'colonial'. India's Foreign Minister met with Iranian Deputy Foreign Minister, details undisclosed.
Web Summary : भारी नुकसान और नेता की मौत के बावजूद, ईरान ने अमेरिका और इजराइल से अंतिम सैनिक और गोली तक लड़ने का संकल्प लिया। ईरान ने अमेरिकी नीतियों की आलोचना करते हुए उन्हें 'औपनिवेशिक' बताया। भारत के विदेश मंत्री ने ईरानी उप विदेश मंत्री से मुलाकात की, विवरण अज्ञात।