शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

Russia-Ukraine War: युक्रेनविरोधात युद्ध कधीपर्यंत सुरु राहणार?; पुतिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 20:00 IST

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियाच्या आण्विक प्रतिबंधक तुकड्या (Nuclear Deterrence Force) अलर्ट मोडवर आहेत. युद्ध मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशिया पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. 

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे युक्रेनचं लष्कर सातत्यानं रशियन हल्ल्याला जशास तसं उत्तर देत आहेत. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला जीवाची पर्वा करत असाल तर माघारी जाण्याचं इशारा दिला आहे. 

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध दिवसेंदिवस वाढत जात आहे. याचपार्श्वभूमीवर आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी ९० मिनिटे फोनवर संवाद साधला. फ्रान्स रशियन लोकांच्या पाठीशी उभा आहे असून त्यांना हे युद्ध नको आहे, असं मॅक्रॉन यांनी यावेळी सांगितलं. मात्र चर्चेदरम्यान पुतीन यांनी आमचं ध्येय साध्य होईपर्यंत युक्रेनविरोधातील युद्ध आम्ही सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं. 

युक्रेनचे मोठे शहर रशियाच्या ताब्यात-

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांनी देश सोडून पलायन केले आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या खेरसन शहराने गेल्या वर्षी नाटो-समर्थित युद्ध सरावाचे आयोजन केले होते. अशा स्थितीत हे शहर काबीज करणे म्हणजे रशियासाठी मोठे यश आहे. आता रशियन सैन्य राजधानी कीवकडे कुच करत आहे.

महापौरांनी गुडघे टेकले-

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, रशियाने खेरसनवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तीन दिवसांपासून नाकाबंदी करण्यात आली होती, त्यामुळे अन्नपदार्थ आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धा आणि अन्य कारणांमुळे रुग्णालयात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, खेरसनच्या महापौरांनीही रशियन सैन्यासमोर गुडघे टेकल्याची माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाFranceफ्रान्सrussiaरशिया