शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

इराणच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करू -ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 12:19 IST

इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील,

वॉशिंग्टन : इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने जर प्रत्युत्तरात काही कारवाई केली, तर त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ले करण्यात येतील, अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.अमेरिकी ड्रोन हल्ल्यात बगदादमध्ये जनरल सुलेमानी (६२) मारले गेले. त्याचा बदला घेण्याचा संकल्प इराणने केला आहे. यामुळे या दोन देशांत तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी असा इशारा दिला आहे की, जर इराणने अमेरिकी सैन्य कर्मचारी आणि संपत्तीवर हल्ला केला, तर इराणमधील ५२ ठिकाणांना लक्ष्य करण्यात येईल. यातील काही स्थळ इराण आणि इराणी संस्कृतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.ट्रम्प यांनी टष्ट्वीट केले आहे की, त्यांनी आमच्या दूतावासावर हल्ला केला आहे आणि अन्य ठिकाणांवर हल्ला करण्याची तयारी करीत आहेत; पण त्यांनी असा प्रयत्न केल्यास त्यांच्या ५२ ठिकाणांवर हल्ला करण्यात येईल.काही वर्षांपूर्वी इराणने ५२ अमेरिकींना ओलिस ठेवले होते. त्याचे प्रतीक म्हणून ही ठिकाणे निश्चित केली आहेत. इराणवरील हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असेल अशी धमकीही दिली आहे.>अमेरिकेकडे लढाईचे साहस नाही : इराणअमेरिकेकडे लढाई सुरू करण्याचे साहस नाही, असे इराणने म्हटले आहे. इराणची सरकारी संवाद समिती आयआयएनएचे मेजर जनरल अब्दुल रहमान मौसावी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, त्यांनी ५२ ठिकाणी हल्ले करण्याची जी धमकी दिली आहे ती लढाई सुरू करण्याचे साहस त्यांच्यात आहे, असे आम्हाला वाटत नाही.>सुलेमानी यांना श्रद्धांजलीकमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तेहरानमध्ये मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेले हजारो लोक शोकसभेत सहभागी झाले होते. १९८०-८८ च्या इराण-इराक युद्धाचे नायक म्हणून लोक सुलेमानी यांच्याकडे पाहतात. सुलेमानी यांचे पार्थिव रविवारी अहवाज विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्यांचे पार्थिव तेहरानला नेण्यात येईल. मंगळवारी त्यांच्या गावी करमनमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.अमेरिका-केन्याच्या सैन्य ठिकाणांवर हल्लासोमालियाच्या अल-शबाब समूहाच्या सदस्यांनी रविवारी केन्याच्या किनारी भागातील लामू क्षेत्रात अमेरिका-केन्याच्या सैन्य ठिकाणांवर हल्ला केला. या सैन्य तळांचा उपयोग अमेरिका आणि केन्याचे सैन्य करते. या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे लामूचे कमिश्नर इरुंगू मेकारिया यांनी म्हटले आहे.

टॅग्स :qasem soleimaniकासीम सुलेमानी