शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत - नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 17:06 IST

आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे असून, नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत.

ठळक मुद्देडिजिटल व्यवहार मोठया प्रमाणात वाढले असून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. भारतात परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत.

मनिला -  आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे असून, नोक-या देणारे तरुण तयार करायचे आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी ’एशियान’ शिखर परिषदेत बोलताना सांगितले. भारतीय लोकसंख्येचा मोठा वर्ग बँक सुविधेपासून वंचित होता. जन धन योजनेमुळे ते चित्र बदलले. लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन झाले असे मोदींनी सांगितले. मिनिमम गर्व्हमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्सवर आमचा भर आहे. मागच्या तीन वर्षात कालबाहय झालेले 1200 कायदे रद्द केले. 

कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया आम्ही अधिक सोपी केली. अनेक परवानग्याही सुलभतेने मिळतील याकडे लक्ष दिले असे मोदींनी सांगितले. डिजिटल व्यवहार मोठया प्रमाणात वाढले असून, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारतात परिवर्तन घडवण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरु आहेत. सोपे, परिणामकारक आणि पारदर्शक प्रशासनासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहोत असे मोदींनी सांगितले.  

’एशियान’ शिखर संमेलानासाठी फिलिपिन्समध्ये आलेले पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीमध्ये मोदी आणि ट्रम्प यांच्यात आशियाई देशांचे भविष्य आणि अमेरिकेशी असलेल्या संबंधांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका  मिळून संपूर्ण जगाचे भविष्य बदलू शकतात, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच भारताच्या केलेल्या कौतुकासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. 

आशियाई शिखर परिषदेतील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गेल्या सहा महिन्यांमधील मोदी आणि ट्रम्प  यांच्यामधील ही दुसरी बैठक आहे. या बैठकीमधून ट्रम्प यांनी भारत हा अमेरिकेसाठी चीनपेक्षा कमी महत्त्वपूर्ण नसल्याचे दाखवून दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध सातत्याने सुधारले आहेत. विशेषकरून  चीनच्या वन बेल्ट वन रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्युत्तर म्हणून भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यातील युतीमधून त्याचे संकेत मिळत आहेत.