Pakistan Attack: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) ओलिस ठेवलेल्या २१४ सैनिकांना मारल्याचा दावा केला आहे. चार दिवसांपूर्वी बीएलएने ट्रेन हायजॅक करत सैनिकांना ओलिस ठेवलं होतं. पाकिस्तान सरकारने ४८ तासांत बलूच कैद्यांची सुटका केली नाही, तर या सर्व लोकांनाही मारले जाईल, असा इशारा बीएलएकडून देण्यात आला होता. या सैन्यांच्या हत्येचा दावा आता बीएलएकडून करण्यात आल्याने पाकमध्ये खळबळ उडाली आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने ओलिस ठेवलेल्या सर्व सैनिकांची आम्ही सुटका केली आहे, असा दावा पाकस्तानी लष्कराकडून करण्यात आला होता. परंतु बीएलएने हा दावा खोडून काढत सरकारने बलूच कैद्यांची सुटका न केल्याने आम्ही सैनिकांची हत्या केल्याचा दावा बीएलएने केला आहे.
पाकिस्तानात नेमकं काय घडतंय?
बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं करण्याची मागणी करणाऱ्या बीएलएने मंगळवारी एका ट्रेनचं अपहरण करत ४० पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्यानंतर बुधवारी ६० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा केला होता. आतापर्यंत शेकडो पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
हल्लेखोरांची संख्या किती?
अपहरण झालेल्या ट्रेनमधील एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, अतिरेक्यांनी वृद्ध, नागरिक, महिला व बालकांना जाऊ दिले. प्रवासी घाबरलेले होते. अंदाजानुसार ते २५० लोकांना बरोबर गेऊन गेले. हल्लेखोरांची संख्या १,१०० होती.