शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

"आता आम्हाला गरज नाही..." इराणविरुद्ध युद्धात ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 12:42 IST

अमेरिकन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिश जेट्स आमच्या संयुक्त तळांवरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडत आहेत. हे या खास नात्याचे खरे सार आहे.

वॉशिंग्टन - युरोपीय देश आता पश्चिम आशियात एअरक्राफ्ट कॅरिअर पाठवण्याचा विचार करत आहेत. युद्ध जिंकल्यानंतर त्यात सहभागी होणाऱ्या लोकांची अमेरिकेला गरज नाही अशा शब्दात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना फटकारले आहे. इराणवरअमेरिका इस्रायल हल्ल्यात ब्रिटनचा पाठिंबा न मिळाल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, यूनाइटेड किंगडम जो आमचा कधीकाळी महान मित्र होता, अखेर तो मध्य पूर्वेत २ विमानवाहू युद्धनौका पाठवण्यावर गंभीर विचार करत आहे. ठीक आहे, पंतप्रधान स्टार्मर आम्हाला आता त्याची गरज नाही. परंतु आम्ही हे लक्षात ठेवू. आम्हाला अशा लोकांची गरज नाही जे युद्ध जिंकल्यानंतर  त्यात सहभागी होतील अशी परखड नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

कीर स्टार्मर काय म्हणाले होते?

बुधवारी ब्रिटनच्या संसदेत पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अमेरिकेची विमाने ब्रिटीश ठिकाणांवरून उड्डाण घेत आहेत. हे आमचे नाते आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिश जेट्स आमच्या संयुक्त तळांवरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडत आहेत. हे या खास नात्याचे खरे सार आहे. आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी दररोज गुप्त माहिती शेअर केली जात आहे. हेच या खास नात्याचे मूळ आहे असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय इराणवरील हल्ल्यात सहभागी न होण्याचा निर्णयही त्यांनी योग्य असल्याचे सांगितले. इराणवर कारवाईसाठी कायदेशीर आधार दिसत नाही असं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटलं.

दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने ७ मार्चपासूनच्या ऑपरेशन्स अपडेट्स शेअर केले आहेत. अमेरिकेने इराणला या प्रदेशात क्षेपणास्त्रे डागण्यापासून रोखण्यासाठी बचावात्मक कारवायांसाठी ब्रिटिश तळांचा वापर सुरू केला आहे. ज्यामुळे ब्रिटिश नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील ब्रिटनच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध खराब केल्याबद्दल कीर स्टार्मर यांच्यावर टीका केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Blasts UK PM on Iran War: 'We Don't Need You'

Web Summary : Trump criticized UK PM Starmer for considering sending carriers to West Asia. He stated the US doesn't need help after winning, referencing Britain's lack of support in a potential US-Israeli strike on Iran. Starmer defended Britain's position, citing a lack of legal basis for action.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल