शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही समाजसेवा करायला आलो नाही, भारतासोबत चीन सारखी...!"; व्यापार करारासंदर्भात अमेरिकेचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 11:45 IST

लँडाउ 'अमेरिका फर्स्ट'चा पुनरुच्चार करत म्हणाले, 'अमेरिका फर्स्ट'चा अर्थ 'अमेरिका एकटा' असा होत नाही. ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवू इच्छित आहेत, त्याच पद्धतीने इतर देशांच्या नेत्यांनीही आपल्या देशाला महान बनवावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

भारत-अमेरिका व्यापार करारात अमेरिका आपले राष्ट्रीय हीत सर्वोपरी ठेवेल, असे अमेरिकेचे डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट ख्रिस्तोफर लँडौ यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, २० वर्षांपूर्वी चीनच्या बाबतीत केलेल्या चुका आता भारतसोबत होऊ देणार नाही. तेव्हा अमेरिकेने आपल्या बाजारपेठा खुल्या केल्या आणि नंतर अनेक क्षेत्रांत चीनने अमेरिकेलाच मागे टाकले.

नवी दिल्ली येथे 'रायसीना डायलॉग २०२६' मध्ये बोलताना लँडाउ म्हणाले, भारताने हे समजून घेणे गरजेचे आहे की, आम्ही तीच चूक पुन्हा करणार नाही. आम्ही बाजारपेठ विकसित करण्यास सांगितले आणि लगेचच तुम्ही आम्हाला अनेक व्यावसायांत मागे टाकू लागलात. असे चीन संदर्भात घडले होते. आता हे भारताच्या बाबतीत टाळले जाईल.

'अमेरिका फर्स्ट' म्हणजे... -लँडाउ 'अमेरिका फर्स्ट'चा पुनरुच्चार करत म्हणाले, 'अमेरिका फर्स्ट'चा अर्थ 'अमेरिका एकटा' असा होत नाही. ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेला पुन्हा महान बनवू इच्छित आहेत, त्याच पद्धतीने इतर देशांच्या नेत्यांनीही आपल्या देशाला महान बनवावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. हा करार दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हितांना पूरक अशा सहकार्यावर आधारित असेल.

आता व्यापार करार 'फिनिश लाईन'च्या जवळ -द्विपक्षीय व्यापार कराराबाबत सकारात्मकता व्यक्त करताना लँडाउ म्हणाले, "हा करार आता 'फिनिश लाईन'च्या जवळ आहे. या यशामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीला मोठी चालना मिळेल. २१ व्या शतकात जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताचा उदय निश्चित आहे. ही भागीदारी कोणतीही 'चॅरिटी' नसून दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आहे. तसेच, "आपण येथे सामाजिक कार्य अथवा चॅरिटीसाठी आलेलो नाही. आपण येथे आहोत, कारण हे आपल्या देशाच्या हिताचे आहे आणि भारताच्याही हिताचे आहे, आपली भागीदारी अधिक घट्ट होवो," असेही लँडाऊ  म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : US prioritizes national interest in trade deal with India, avoids China mistake.

Web Summary : America prioritizes its interests in trade with India, learning from past mistakes with China. Deputy Secretary of State Landow emphasized this at Raisina Dialogue 2026. The US seeks mutually beneficial cooperation, not charity, aiming for a strong partnership that benefits both nations. A trade deal is nearing completion.
टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत