शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

भारताशी पंगा घेणं पडतंय महागात! पाकिस्तानमध्ये पाण्यासाठी हाहाकार, पीक पेरणीवरही मोठा परिणाम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:26 IST

Water Crisis In Pakistan : पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील ...

Water Crisis In Pakistan :पाकिस्तान सध्या तीव्र पाणी संकटाचा सामना करत आहे. शेतीचा खरीप हंगाम सुरू असताना देशातील अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानसाठी ही परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. भारताने अलीकडेच सिंधू पाणी करार स्थगित केल्याने या संकटात अधिक भर पडली आहे.

भारताचा कडक इशाराजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर इशारा दिला. सीमापार दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरल्याने भारताने सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही" असे ठाम विधान करत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे.

धरणांचे पाणी साठे अर्ध्यावरसिंधू नदी प्रणालीतील प्रमुख धरणांपैकी मंगला आणि तारबेला धरणांमधील पाण्याची पातळी गंभीर पातळीवर खाली आली आहे. इंडस रिव्हर सिस्टिम अथॉरिटीच्या (IRSA)  माहितीनुसार, मंगला धरणाची एकूण क्षमता ५.९ दशलक्ष एकर फूट (MAF) असून, सध्या फक्त २.७ एमएएफ पाणी शिल्लक आहे. तर, तारबेला धरणाची क्षमता ११.६ एमएएफ असून, त्यामध्ये केवळ ६ एमएएफ पाणी उरले आहे.

खरीप हंगाम धोक्यातपाण्याच्या टंचाईमुळे खरीप पिकांची पेरणी धोक्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये सिंचन आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम होत आहे. चिनाब नदीतून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातही भारताने केलेली कपात पाकिस्तानसाठी अडचणीची ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा आक्रोशपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाण्याच्या समस्येवर जागतिक पातळीवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेकदा भारतासोबत चर्चेची विनंती केली असली, तरी भारताने दहशतवाद आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच चर्चा होईल, हे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला