शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ, उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 16:55 IST

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ असल्याचं म्हणत उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं आहे.

प्योंगयांग- उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ असल्याचं म्हणत उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.उत्तर कोरियासोबत युद्ध करणे म्हणजे आगीच्या ज्वाळांसोबत खेळण्यासारखं आहे. अमेरिकेला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असंही उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले आहेत. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री री योंग म्हणाले, आम्ही आण्विक शस्त्र क्षेत्रात पूर्णतः शांती व सुरक्षेची हमी देतो. मात्र हा चर्चेचा विषय नाही. आमच्यासोबत कोणीही आण्विक शस्त्रास्त्रांसंदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-ऊन यांनी सुरू ठेवलेल्या शक्तिशाली बॉम्बच्या चाचण्या आणि अमेरिकेविरोधातील शाब्दिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही दम द्यायला सुरुवात सुरूच ठेवली आहे. पुन्हा एकदा अमेरिकेने आपली शक्तिशाली बॉम्बर विमाने किम जोंग-ऊनच्या भूमीवरून उडविली होती.उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक क्षेपणास्त्र आणि अणु चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तुकडीशी ‘अनेक पर्यायांवर’ चर्चा केली. त्याचवेळी ही विमाने उत्तर कोरियावर घिरट्या घालत होती. उत्तर कोरियाने यावर्षी फेब्रुवारीपासून 15 चाचण्यांत 22 क्षेपणास्त्रे डागली. ही क्षेपणास्त्र चाचणी थांबवा, अन्यथा परिणाम वाईट होती, या अमेरिकेच्या धमकीला न बधता उत्तर कोरियाचे किम जोंग-ऊन यांनी चाचण्या सुरूच ठेवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी मंगळवारी संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस आणि अमेरिकेचे जॉर्इंट चीफ आॅफ स्टाफचे अध्यक्ष जनरल जोसेफ डनफोर्ड यांच्यासह वरिष्ठ सल्लागारांची व्हाइट हाऊसमध्ये भेट घेतली होती.येत्या काळात तणातणी आणखी वाढणार-उत्तर कोरियाकडून कोणत्याही स्वरुपात आक्रमण झाल्यास कशा प्रकारे प्रतिकार करता येईल आणि गरज भासल्यास उत्तर कोरियाला कसे रोखता येईल याच्या अनेक पर्यायांवर यावेळी चर्चा झाली, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. एकूण अमेरिकेने उत्तर कोरियाच्या चाचण्यांची घेतलेली दखल आणि त्या देशावरून बॉम्बर विमानांची उड्डाणे यांमुळे तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प