शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एका रात्रीत कोट्यधीश बनला वेटर, तब्बल १० कोटी मिळाले अन् मग काय केलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 17:40 IST

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आणि तो एका रात्रीत कोट्यधीश बनला. त्याच्याकडे १० कोटी रुपये आले.

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीचं नशीब फळफळलं आणि तो एका रात्रीत कोट्यधीश बनला. त्याच्याकडे १० कोटी रुपये आले. पण लक्षवेधी गोष्ट अशी की इतके पैसे आल्यानंतरही त्यानं आपली नोकरी सोडली नाही. आपण नोकरी सोडली तर रेस्टॉरंटमधील सहकाऱ्यांची खूप आठवण येईल त्यामुळे नोकरी न सोडण्याचा निर्णय त्यानं घेतला. 

'द सन'च्या वृत्तानुसार, यूकेच्या कार्डिफ येथे राहणाऱ्या ल्यूक पिटार्ड गेल्या काही वर्षांपासून मॅकडोनल्ड्समध्ये काम करतो. याच दरम्यान त्याला १३ कोटी १८ लाख रुपयांची लॉटरली लागली. नॅशनल लॉटरीचा विजेता बनल्यानंतर त्याचं नशीब चमकलं. पण त्यानं आपली नोकरी सोडली नाही. 

२००६ साली घडलेल्या या घटनेची माहिती सांगताना ल्यूक सांगतो की त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड एमा कॉक्स देखील नोकरी करत होती. लॉटरी जिंकल्यानंतर दोघांनी लग्न केलं. मग अडीच कोटी रुपये प्रॉपर्टी खरेदी करण्यावर खर्च केले. 

कोट्यवधींचा मालक, पण वेटरची नोकरी सोडली नाहील्यूक आणि एमा परदेश दौऱ्यावर देखील गेले. लॉटरीतील काही रक्कम त्यांनी गुंतवणूक केली आणि वर्षभराच्या कालावधीनंतर ल्यूक पुन्हा नोकरीवर परतला. पुन्हा वेटरचं काम करताना पाहून ल्यूकच्या सहकाऱ्यांनाही धक्का बसला. कोट्यधीश झाल्यानंतर ल्यूक काही वेटरचं काम करेल अशी अपेक्षा सहकाऱ्यांना नव्हती. पण ल्यूकनं आपले पाय अजूनही जमिनीवरच आहेत हे कृतीतून सिद्ध करुन दाखवलं. 

"मी कोट्यधीश होण्याआधी मॅकडॉनल्ड्समध्ये काम करायचो. मला ते काम आवडायचं. आज श्रीमंत असलो तरी कामातून आनंद मिळतो. सहकारी कर्मचारी देखील आमच्या लग्नाला आले होते. मी नेहमी त्यांच्यासोबत संपर्कात राहत आलो आहे. मग मीच विचार केला की पुन्हा नोकरी का करायची नाही?", असं ल्यूकनं सांगितलं. 

ल्यूकची पत्नी एमानंही त्याच्या नोकरीवर परतण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं. "आम्ही दोघंही मॅकडॉनल्ड्समध्ये काम करायचो. दोघांनाही काम करण्याचा आनंद घेता येत होता. तिथं आमचे चांगले मित्र आहेत. ल्यूक कामावर परतल्याचा मॅनेजरलाही आनंद झाला", असं एमा म्हणाली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल