शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

'त्याने' २५ अब्ज किलोमीटरवरून केला संपर्क; ‘नासा’सह विज्ञान क्षेत्रात आनंदाची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 6:19 AM

अंतराळयान व्हॉयजर-१ पाच महिन्यांनी पुन्हा सक्रिय, अंतराळात सर्वांत दूर गेलेले हे पहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे. 

न्यूयॉर्क : पाच महिन्यांच्या खंडानंतर व्हॉयजर-१ हे अंतराळयान पुन्हा सक्रिय करण्यात अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) यश आले आहे. प्रदीर्घ काळानंतर जेव्हा या यानाने विश्वातील २५ अब्ज किलोमीटर अंतरावरून पृथ्वीला संदेश पाठवला, तेव्हा नासासह विज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंदाची लाट उसळली. 

सुमारे पाच महिन्यांच्या खंडानंतर नासाला व्हॉयजर-१ या अंतराळयानाकडून संदेश मिळाला आहे. विश्वात २५ अब्ज किलोमीटर दूर फिरणाऱ्या या यानाने १४ नोव्हेंबर २०२३ नंतर संदेश पाठवणे बंद केले होते. अंतराळात सर्वांत दूर गेलेले हे पहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे. 

एलियन्ससाठी ‘गोल्डन रेकॉर्ड’अंतराळात पाठवलेल्या संदेशांना ‘गोल्डन रेकॉर्ड’ म्हणतात. सोन्याचा मुलामा असलेल्या १२-इंच तांब्याच्या डिस्कवर एलियन्ससाठी संदेश रेकॉर्ड केला जातो. गोल्डन रेकॉर्डमध्ये सौर यंत्रणेच्या नकाशासह युरेनियमचा तुकडादेखील आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की, युरेनियमचे वय एलियन्सला हे यान केव्हा प्रक्षेपित करण्यात आले हे शोधण्यास मदत करेल. डिस्क सुरू करण्यासाठी निर्देशदेखील आहेत.

२०१२ मध्ये स्टार्सपर्यंत पोहोचले१९७७ मध्ये व्हॉयेजर-१ लाँच करण्यात आले. २०१२ मध्ये याने आंतरतारकीय माध्यमात (सौरमंडळाबाहेरील ताऱ्यांच्या विश्वात) प्रवेश केला. असे करणारे ते पहिले अंतराळयान होते. पृथ्वीवरून पाठवलेले संदेश तेथे पोहोचण्यासाठी सुमारे २२.५ तास लागतात. नासाने २०१८ मध्ये व्हॉयेजर-२ नावाचे त्यांचे दुहेरी अंतराळ यान देखील प्रक्षेपित केले. दोन्ही यानांत अंतराळातील संभाव्य एलियनसाठी संदेश वाहून नेलेले, असण्याची शक्यता आहे.

चिपमध्ये होती समस्या...व्हॉयेजरच्या शांततेमागे चिपमधील त्रुटी जबाबदार होती. तज्ज्ञांनी ४६ वर्षे जुन्या संगणक प्रणालीची ही चिप नवीन कोडसह दुरुस्त केली. नासाच्या म्हणण्यानुसार व्हॉयेजरकडून आता अंतराळयान वाचता येईल, असे संदेश पाठवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला डेटा पाठविण्यास सक्षम बनवणे ही पुढील पायरी असेल. व्हॉयेजर-१ ची बॅटरी २०२५ नंतर संपू शकते, याचा अंदाज आहे. त्यानंतरही तो आकाशगंगेत फिरत राहील. 

टॅग्स :NASAनासा