शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Volodymyr Zelensky: वोलोडिमीर जेलेन्स्कींनी अमेरिकन संसदेत दाखवला युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडिओ, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:25 IST

Ukraine Russia War: ''आम्हाला युद्ध नको, शांतता हवी आहे. युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, पण रशियाचे हल्ले सुरुच आहेत.''

वॉशिंग्टन: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी अमेरिकन संसदेला (US Congress)  संबोधित केले. यादरम्यान सर्व अमेरिकन खासदारांनी जेलेन्स्की यांना उभे राहून अभिवादन केले. यावेळी झेलेन्स्की म्हणाले की, ''आम्हाला युद्ध नकोय, युद्ध थांबायला हवे. युद्ध थांबवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पण, रशिया ऐकायला तयार नाही. ते सातत्याने  आमच्यावर क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे.''

'रशियाला शरण जाणार नाही'यावेळी जेलेन्स्की यांनी अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धाची आठवण करुन दिली आणि युक्रेनच्या विध्वंसाचा व्हिडिओही अमेरिकन संसदेत दाखवला. जेलेन्स्की म्हणाले, ''रशिया फक्त आमच्या जमिनीवर नाही, तर आमच्या अधिकारांवरही हल्ला करतोय. काहीही झाले तरी, रशियाला शरण येणार नाहीत. अमेरिकेने रशियावर आणखी कठोर निर्बंध लादावेत.'' जेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचेही आभार मानले. 

यूएस संसदेला 9/11ची आठवण करुन दिलीजेलेन्स्की पुढे म्हणाले की, ''अमेरिकेतील लोकांसारखी सामान्य जीवनशैली आम्हाला युक्रेनमधील आमच्या लोकांसाठी हवी आहे. 1941 ची सकाळ आठवा, जेव्हा अमेरिकेवर हल्ला झाला होता, 11 सप्टेंबरचा तो दिवस आठवा जेव्हा अमेरिकेवर हल्ला झाला होता. अशाच प्रकारचे हल्ले दररोज आमच्यावर होत आहेत आणि आम्ही ते थांबू शकत नाही. आतापर्यंत रशियाकडून युक्रेनवर 1000 हून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत, हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे,''अशी माहिती जेलेन्स्की यांनी दिली.

'युक्रेनवर नो फ्लाय झोन नियम लागू करा' जेलेन्स्की पुढे म्हणाले की, ''मला आतापर्यंत अमेरिकेने खूप काही दिले, आता मी आणखी एक मागणी करत आहे. युक्रेनवर नो फ्लाय झोनचा नियम लागू करा. हा नियम लागू केल्यावर रशिया आमच्यावर हल्ला करू शकणार नाही. रशियाकडून हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला जातोय. मला माझ्या देशाचे रक्षण करायचे आहे. अमेरिकेच्या लोकांना वाटत असेल की, आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे, तर आमच्यासोबत या आणि युक्रेनच्या लोकांना मदत करा,''असे आवाहनही जेलेन्स्की यांनी यावेळी केले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाAmericaअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिन