शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानं सुनामीचा कहर, 168 लोकांचा मृत्यू, 600 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 12:52 IST

इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे.

ठळक मुद्दे इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. सुनामीममध्ये आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना दिली

जकार्ता- इंडोनेशियामध्ये पुन्हा एकदा सुनामी आली आहे. या सुनामीममध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक जण जखमी आहेत. इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंच ही सुनामी आल्याची माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. जावाचा दक्षिणी भाग आणि दक्षिणी सुमात्राच्या किनाऱ्यावरील आलेल्या या सुनामीनं डझनांहून अधिक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या आहेत. ही सुनामी स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 9.30 वाजता आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नुग्रोहो यांनी दिली आहे.या सुनामीमध्ये आतापर्यंत 168 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 600हून अधिक लोक जखमी आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानं समुद्राच्या आत भूस्खलन झालं आणि लाटा मोठ्या प्रमाणात उसळल्या. त्यानंतर या लाटांनी सुनामीचं स्वरूप धारण केलं. इंडोनेशियातील भूवैज्ञानिकांनी या सुनामीच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही नुग्रोहो यांनी व्यक्त केली आहे. अनक क्रॅकटो हे छोटं ज्वालामुखीचं बेट आहे. 1883मध्ये क्रॅकटो ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे हे बेट अस्तित्वात आलं. इंडोनेशियाला याआधीही बसला होता सुनामीचा फटकागेल्या काही दिवसांपूर्वीही इंडोनेशियाला अशाच भूकंपाचा जोरदार धक्का बसून त्यापाठोपाठ सुनामी आली होती. त्या सुनामीमुळे इंडोनेशियामध्ये 1763 जणांचा मृत्यू झाला होता. अनेक लोक बेपत्ता होते. सुलावेसी बेट परिसरात 28 सप्टेंबर रोजी 7.5 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला व सुनामीचेही संकट ओढावले. याचा मोठा फटका पालू-पेटोबो व बालारोआ या दोन भागांना बसला. तेथील इमारती कोसळून त्याच्या ढिगाऱ्याखाली कित्येक लोक दबले गेले होते. त्यातील अनेकांची बचावपथकांनी सुखरूप सुटका केली; परंतु तरीही अद्याप पाच हजार जण बेपत्ता होते.राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पुरवो नुग्रोहो यांनी सांगितले होते की, कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-यांखाली अद्यापही अडकून पडलेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. त्यात ज्या व्यक्तींचा शोध लागणार नाही त्यांना बेपत्ता किंवा मृत म्हणून जाहीर केले जाईल. पालू येथील पेटोबो या गावामध्ये भूकंप-त्सुनामीने खूपच नुकसान झाले होते. 

टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया