शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

या देशात फुटला महागाईचा ज्वालामुखी, महागाई दर १००टक्क्यांजवळ, तर व्याजदर ७५ टक्क्यांवर, महिनाभरात बदलले तीन वित्तमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 13:15 IST

Inflation In Argentina: गेल्या काही काळापासून संपूर्ण जग महागाईशी झुंजत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मात्र जशी अवस्था अर्जेंटिनाची झाली आहे. तशी क्वचितच कुठल्या देशाची झाली असेल

 ब्युनॉस आयर्स - गेल्या काही काळापासून संपूर्ण जग महागाईशी झुंजत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. मात्र जशी अवस्था अर्जेंटिनाची झाली आहे. तशी क्वचितच कुठल्या देशाची झाली असेल. येथे महागाईने लोकांचं जगणं कठीण करून टाकलं आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येथील महागाई दर वाढून ७९ टक्के झाला आहे. तर महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने व्याजदरांमध्ये ५.५ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे देशातील व्याजदर ७५ टक्क्यांवर पोहोचले आहेत. देशातील केंद्रीय बँकेने यावर्षी नवव्यांदा व्याजदरात कपात केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार वाढत्या महागाईमुळे त्रस्त जनता सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. अर्थशास्त्रज्ञांनी अर्जेंटिनामध्ये महागाई दर हा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. तर केंद्रीय बँकेच्या संचालक मंडळाने पुढच्या वर्षी सेंट्रल बँकेकडून ठेवण्यात आलेल्या अल्पकालीन कर्जाच्या स्तराला कमी करण्यावरही विचार करण्यात येत असल्याचे सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीही पुढे आली आहे.

अर्जेंटिनाच्या सेंट्रल बँकेचे अध्यक्ष मिगुएल पेस आणि अर्थमंत्री सर्जियो मस्सा यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ४४ दशलक्ष डॉलर देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यासाठी अर्जेंटिनाला आपले व्याजदर महगाई दरापेक्षा अधिक ठेवावे लागतील.

त्यासाठी आता अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेने व्याजदरामध्ये ५.५ टक्क्यांनी वाढवून ७५ टक्के केले होते. मात्र अजूनही हा व्याजदर महागाई दरापेक्षा कमी आहे. दरम्यान, वारेमाप महागाई वाढत असल्याने आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यात अपयश आल्याने गेल्या काही काळात अर्जेंटिनामध्ये तीन अर्थमंत्री बदलले आहेत. 

टॅग्स :InflationमहागाईArgentinaअर्जेंटिनाInternationalआंतरराष्ट्रीय